बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) सध्या चर्चेत आहे. ती नुकतीच मुंबईतील एका कार्यक्रमात दिसली होती. पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये अथिया खूपच सुंदर दिसत होती, मात्र काहींना तिचा लूक आवडला नाही. अनेक युजर्सनी तर ती बुरखा घालून आल्याचेही म्हटले आहे. त्याचवेळी अनेकजण असभ्य आणि मूर्खपणाच्या कमेंट करत आहेत. अथियाचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या अथिया शेट्टीच्या व्हिडीओत तिने पांढऱ्या रंगाचा वन शोल्डर गाऊन घातल्याचं पाहायला मिळत आहे. तिने पापाराझींसमोर पोझ दिली, पण लोक तिला ज्या पद्धतीने एक्सप्रेशन देत होते त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तिच्या लूकची खिल्ली उडवली जात आहे. काही लोक तिचे पती केएल राहुलचे नावही घेत आहेत.
अथिया शेट्टीच्या व्हिडिओवर युजर्स तिला ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले की, 'तिचा चेहरा मुलीसारखा नाही, तिचा चेहरा सुनील शेट्टीसारखा आहे, हे पाहून मुलगी असल्याचे अजिबात वाटत नाही.' दुसर्या युजरने कमेंट केली, 'काय बोलावे कळत नाही. हाईट बॉडी चांगली आहे, पण क्वचितच कुठला पोशाख तिला शोभतो. साडी आणि सलवार सूट तिने जास्त परिधान केले पाहिजे. आवडेल.