बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वामध्ये जणू लग्नाचे वारे वाहत आहेत. एकापाठोपाठ एक कलाकार आणि क्रिकेटपटू लग्नबेडीत अडकत आहेत. आलिया भट (Alia Bhatt)-रणबीर कपूर(Ranbir Kapoor)च्या लग्नानंतर आता पुन्हा एकदा लगीनघाई सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटर के. एल. राहुल (K.L.Rahul) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. त्यांचा व्हेडिंग प्लानसुद्धा तयार असल्याचे म्हटले जात आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, पुढच्या तीन महिन्यात हे दोघे विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
अथिया शेट्टी नुकतीच केएल राहुलच्या शस्त्रक्रियेनंतर जर्मनीहून परतली आहे. वास्तविक केएल राहुल त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी परदेशात गेला होता. प्रशिक्षणादरम्यान केएल राहुलला पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे आधी केएल राहुल जर्मनीला रवाना झाला होता, नंतर अथियाही तिच्या बॉयफ्रेंडची काळजी घेण्यासाठी तिथे पोहोचली होती. आता बातमी समोर येत आहे की हे कपल येत्या तीन महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे.
अथिया आणि राहुल येत्या तीन महिन्यांत मुंबईत लग्नबंधनात अडकणार असल्याचेही बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया शेट्टी आणि केएल राहुल या दोघांच्या कुटुंबासाठी हा मोठा कार्यक्रम असेल. अथिया स्वतः या खास दिवसाला आणखी खास बनवण्याच्या तयारीत व्यस्त आहे. लग्नाच्या प्रत्येक फंक्शनसाठी ती स्वत:ला तयार करत असल्याचे बोलले जात आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी गेल्या वर्षी त्यांचे नाते अधिकृत जाहीर केले होते.