ऑनलाइन लोकमत
कराची, दि. १७ - नव्या वर्षाच्या सुरवातीलाच महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झालेली दिसत असून बंगळुरूमधील सामूहिक विनयभंगाची घटना तर या सर्वांवरील कळस ठरली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला सेलिब्रेशनसाठी रस्त्यावर उतरलेल्या तरूणींची मद्यधुंद अवस्थेतील तरूणांनी छेड काढली. विशेष म्हणज मोठ्या प्रमाणात पोलिसाचा फौजफाट उपस्थित असूनही ही लाजिरवाणी घटना कोणी रोखू शकले नाही. या घटनेवर समजातून चहूबाजूंनी टीका होत असतानाच सेलिब्रेटिंनीही निषेध नोंदवला आहे. मात्र काही सेलिब्रिटी असे असतात जे फक्त बोलत नाहीत तर करूनही दाखवतात, त्यापैकच एक म्हणजे पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम.
शनिवारी पाकिस्तानात आतिफची म्युझिक कॉन्सर्ट पार पडली. आटिफ स्टेजवर परफॉर्म करत असतानाच पहिल्य रांगेतील एका इसमाने एक तरूणीची छेड काढली आणि तिला त्रास देऊ लागला. हे लक्षात येताच आतिफने त्याचे गाणे तत्काळ थांबवले आणि त्या पीडित तरूणीला तेथून बाहेर पडम्यास मदत केली. एवढेच नव्हे तर त्या तरूणीशी असे दुष्कृत्य करू धजावणा-या त्या इसमालाही आतिफने फैलावर घेतले. ' या ठिकाणी तुझी आई किंवा बहीणही असू शकते. मुलगी पाहिली नाही का कधी?' असा सवाल विचारत आतिफने त्याला खडसावले. आतिफचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल जाला असून त्याच्या या भूमिकेच खूप कौतुक होत आहे.
#AtifAslam stopped in the middle of concert & scolded guy who was harassing girls.This man deserves every bit of respect he has today❤️