Join us

'जवान'नंतर अ‍ॅटली पुन्हा करणार शाहरूख खानसोबत काम, दिग्दर्शक म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 4:40 PM

Atlee Kumar And Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत 'जवान' हा रेकॉर्डब्रेक चित्रपट बनवणाऱ्या अ‍ॅटली कुमारला आता अभिनेत्यासोबत आणखी एक चित्रपट बनवायचा आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan)सोबत 'जवान' (Jawan Movie) हा रेकॉर्डब्रेक चित्रपट बनवणाऱ्या अ‍ॅटली कुमार(Atlee Kumar)ला आता अभिनेत्यासोबत आणखी एक चित्रपट बनवायचा आहे. तमीळ चित्रपट दिग्दर्शक अ‍ॅटली हा शाहरुखचा मोठा चाहता आहे आणि त्याला त्याच्यासोबत काम करण्याची नेहमीच इच्छा होती. 'जवान'मध्ये ही इच्छा पूर्ण झाल्यावर त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अ‍ॅटली शाहरुखला भारतीय चित्रपटसृष्टीतील स्टारडम आणि सभ्यतेचे प्रतीक मानतो.

अ‍ॅटली कुमारने 'एबीपी कॉन्क्लेव्ह'मध्ये शाहरुख खानचे खूप कौतुक केले आणि त्याच्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. आता तो 'जवान' पेक्षाही सशक्त विषय घेऊन शाहरुखसोबत करणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, 'मला त्याचे सर्व चित्रपट आवडतात, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है', 'ओम शांती ओम', 'चेन्नई एक्स्प्रेस'... यादी मोठी आहे आणि मी नावे मोजणे सुरू ठेवू शकतो. माझ्यासाठी तो जगभरातील भारतीय चित्रपटांचा चेहरा आहे. शाहरुख सरांसोबत काम करणे हे एक स्वप्न आहे. सुदैवाने मला माझ्या पाचव्या चित्रपटात हे करण्याची संधी मिळाली. देव दयाळू आहे आणि मला वाटते की मी चित्रपटाला न्याय देऊ शकलो आहे.

शाहरुखसोबत पुन्हा काम करण्याबाबत ॲटली म्हणाला...भविष्यात शाहरुखसोबत पुन्हा काम करण्याची शक्यता आहे का, असे अ‍ॅटलीला विचारले असता तो म्हणाला, 'नक्कीच, मी पुन्हा त्याच्यासोबत काम करेन. मी 'जवान' पेक्षा चांगला विषय घेऊन येईन आणि त्याच्याकडे नक्की जाईन. मग मी ते त्यांना सांगेन. शाहरुख सरांना आवडले तर आम्ही दोघे पुन्हा एकत्र काम करू असे नक्कीच होईल. मला माहित आहे की त्यांचे माझ्यावर खूप प्रेम आहे. मी माझ्या आयुष्यात त्यांच्यासारखा चांगला माणूस पाहिला नाही. धन्यवाद, शाहरुख सर. 'जवान' पेक्षा मोठे काहीतरी क्रॅक झाले की मी तुमच्याकडे परत येईन. 

जवानने केली एवढी कमाई२०२३ मध्ये 'जवान' रिलीज झाला होता आणि त्याने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांना मागे टाकले. शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हर आणि प्रियामणी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने देशभरातून ६४०.२५ कोटी रुपये आणि जगभरात ११६० कोटी रुपये कमवले होते.

टॅग्स :शाहरुख खानजवान चित्रपट