तरच भक्त सिनेमा पाहतील...; ‘ब्रह्मास्त्र’बद्दल कॉमेडियन अतुल खत्रीनं केलं ट्विट, पाहून भडकले विवेक अग्निहोत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 11:46 AM2022-09-08T11:46:13+5:302022-09-08T11:46:40+5:30
Brahmastra: होय, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची भाषा बोलणाऱ्या लोकांना कॉमेडियन अतुल खत्री जोरदार टोला लगावला आणि यामुळे ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा पारा चढला.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भटचा ( Alia Bhatt)) ‘ब्रह्मास्त्र’ ( Brahmastra) हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याचमुळे ‘बायकॉट’चं संकट असूनही ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटाला चांगलं ओपनिंग मिळेल, असा विश्वास मेकर्सला वाटत आहे. पण सोशल मीडियावर चित्रपटाला होत असलेला विरोध अद्यापही सुरू आहे. अशात असं काही घडलं की,‘ब्रह्मास्त्र’ऐवजी याचीच चर्चा रंगली.
होय, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची भाषा बोलणाऱ्या लोकांना कॉमेडियन अतुल खत्री (Atul Khatri) जोरदार टोला लगावला आणि यामुळे ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा (Vivek Ranjan Agnihotri) पारा चढला. आता कॉमेडीयन काय बोलला आणि विवेक अग्निहोत्रींचा पारा का चढला ते जाणून घेऊ यात.तर अतुल खत्रीने एक ट्विट केलं आणि हे ट्विट वाचनू विवेक अग्निहोत्री संतापले.
Rename the movie to Brahmastra Files and all the Bhakts will watch it 😁
— Atul Khatri (@one_by_two) September 7, 2022
‘चित्रपटाचं नाव बदलून ब्रह्मास्त्र फाईल्स करा, तेव्हाच सर्व भक्त हा सिनेमा पाहतील,’ असं ट्विट अतुल खत्रीनं केलं. त्याच्या या ट्विटला विवेक अग्निहोत्रींनी लगेच उत्तर दिलं. ‘तू आपलं नाव अतुल संत्री कर, तुला रोजगार मिळेल,’ अशा शब्दांत अतुल अग्निहोत्रींनी उत्तर दिलं.
Change your name to Atul Santri, you will find employment. 😆 https://t.co/Ee0vTVf5FJ
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) September 7, 2022
‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर हा सिनेमा उद्या 9 सप्टेंबरला चित्रपटगृहांत धडकणार आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी 25 कोटींची कमाई करेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. वीकेंडला हा सिनेमा 75 कोटींच्या घरात गल्ला जमवले, असाही दावा केला जात आहे. पण हे आकडे किती खरे सिद्ध होतात, ते लवकरच कळेलच.
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा बिझनेस केला होता.