Join us

अतुल परचुरे म्हणतो, विनोदी अभिनेत्याने या गोष्टीचा भान ठेवायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 7:15 AM

अभिनेता अतुल परचुरेनं हिंदी-मराठी सिनेमात, नाटकात अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या आहेत. झी मराठी वरील 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत अतुल मोहनची व्यक्तिरेखा साकारतोय.

अभिनेता अतुल परचुरेनं हिंदी-मराठी सिनेमात, नाटकात अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या आहेत. झी मराठी वरील 'भागो मोहन प्यारे' या मालिकेत अतुल मोहनची व्यक्तिरेखा साकारतोय. पाहता पाहता या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले आहे. आपल्या अनोख्या स्टाइलनं प्रेक्षकांना हसवणारा अभिनेता अतुल परचुरे या मालिकेतून प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झालाय. या विनोदी मालिकेमुळे प्रेक्षकांचा ताण दूर होतो. यासाठी कलाकार देखील खूप मेहनत घेत असतात कारण विनोदनिर्मिती करणे तितकेच आव्हानात्मक असते.

याबद्दल बोलताना अतुल परचुरे म्हणाले, "विनोदी अभिनेत्याला समाजाचे भान असायला हवे. कारण त्याशिवाय विनोदाची जाण निर्माण होत नाही. लेखकाने लिहिलेले विनोद अभिनेत्यापर्यंतच पोहचले नाही तर प्रेक्षकांपर्यंत तो काय पोहचवणार, असा प्रश्न आहे. त्यामुळे अभिनेत्याने सजग असायला हवे. बऱ्याचदा चित्रीकरणादरम्यान संहितेच्या पलीकडचे अनेक विनोद हे ओघाओघाने येऊनही जातात आणि प्रसंगाला अजूनच मजा येत जाते.

विनोदी अभिनयाच्या बाबतीत सांगायचे झाले तर इतर अभिनयापेक्षा विनोदी पात्राला असलेले कंगोरे काहीसे वेगळे असतात. कारण हे पात्र कायम सगळ्यांपेक्षा वेगळे असते. जसे ‘जागो मोहन प्यारे’मधला मोहन हा एवढा बुजरा आणि साधा आहे की त्याचा साधेपणा टिकवणे हेच त्या मालिकेतील विनोदनिर्मितीचे  गमक आहे. विशेष म्हणजे लोक मालिकेशी  एकरूप होत असल्याने हळूहळू त्यांना पात्र परिचयाचे होते त्यामुळे पात्राच्या पलीकडे जाऊन त्या पात्राचा विचार करावा लागतो."

टॅग्स :भागो मोहन प्यारेझी मराठी