खलनायक साकारण्याची ही पहिलीच वेळ होती अतुल परचुरेंनी सांगितला त्यांचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 07:06 PM2021-07-09T19:06:13+5:302021-07-09T19:16:45+5:30

अल्पाधीत मालिकेतील 'जेडी' या खलनायकानेही रसिकांच्या मनात घर केलं आहे. खरोखर प्रेक्षकांना जेडीचा राग येईल इतकी चोख भूमिका अभिनेता अतुल परचुरे हे निभावत आहेत.

Atul Parchure Share His Experience About First Time playing Neagative Role JD In Majha Hoshil Na | खलनायक साकारण्याची ही पहिलीच वेळ होती अतुल परचुरेंनी सांगितला त्यांचा अनुभव

खलनायक साकारण्याची ही पहिलीच वेळ होती अतुल परचुरेंनी सांगितला त्यांचा अनुभव

googlenewsNext

'माझा होशील ना' ही मालिका दिवसेंदिवस रंजक आणि रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. सुरुवातीपासून रंजक वळणामुळे रसिकही मालिकेला खिळून आहेत.दिवसेंदिवस मालिका आणखी रंजक होत आहे. मालिकेतील सगळीच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहेत. मालिकेतील सगळेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असताना जेडी या भूमिकेलादेखील विशेष पसंती मिळत आहे.  

 'माझा होशील ना या' मालिकेत अतुल परचुरी यांनीही खलनायकी व्यक्तीरेखा साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. खरंत मालिकेत अतुल परचुरींची एंट्री होणार तेव्हापासूनच रसिकांची उत्सुकताही वाढली होती. अल्पाधीत मालिकेतील 'जेडी' या खलनायकानेही रसिकांच्या मनात घर केलं आहे. खरोखर प्रेक्षकांना जेडीचा राग येईल इतकी चोख भूमिका अभिनेता अतुल परचुरे हे निभावत आहेत.या भूमिकेसाठी त्यांना प्रेक्षक चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत.
या भूमिकेतबद्दल बोलताना अतुल परचुरे म्हणाले, "कधी कधी आपण फार विचार न करता एखाद्या भूमिकेला हो म्हणतो तसं काहीसं या जेडीबाबत झालं. 

मला आयुष्यात पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारणा केली होती. त्यामुळे प्रयत्न करून बघू या असा विचार केला. जेडी साकारतानाचा अनुभव फारच मनोरंजक आणि आव्हानात्मक आहे. काम आवडतंय अशा प्रतिक्रियांबरोबरच प्रेक्षकांना जेडीचा रागही येतोय. हेच त्या भूमिकेचा यश असावं." 

जेडीच्या भूमिकेसाठी केलेल्या तयारी बद्दल बोलताना ते म्हणाले, "वेगवेगळ्या मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यानं चेहरेपट्टी प्रेक्षकांना माहीत झालं आहे. त्यामुळे जेडी सगळ्यांपेक्षा वेगळा वाटावा यासाठी मी प्रयत्न करतोय. सूडाची भावना माझ्यात दिसणं आवश्यक होतं. तसंच महाराष्ट्र सोडून २० वर्षं अमराठी लोकांबरोबर राहिल्यानं त्याची भाषा बिघडली असावी. या दोन गोष्टी डोक्यात ठेवून काम करतोय."
 

Web Title: Atul Parchure Share His Experience About First Time playing Neagative Role JD In Majha Hoshil Na

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.