Join us

मराठी चित्रपटाचा प्रेक्षक संपन्न रसिकतेचा

By admin | Published: February 12, 2016 3:10 AM

मराठी चित्रपटाचा प्रेक्षक हा संपन्न रसिकतेतून जन्मला आहे. तो प्रत्येक गोष्टीला भरभरून प्रतिसाद देत असतो. नेहमी नावीन्याची वाट पाहत असतो. मनोरंजनात्मक चित्रपटांना

मराठी चित्रपटाचा प्रेक्षक हा संपन्न रसिकतेतून जन्मला आहे. तो प्रत्येक गोष्टीला भरभरून प्रतिसाद देत असतो. नेहमी नावीन्याची वाट पाहत असतो. मनोरंजनात्मक चित्रपटांना ज्याप्रमाणे दाद मिळते, तशीच सामाजिक चित्रपट पाहणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सामाजिक व मनोरंजनात्मक चित्रपट पाहणाऱ्यांची संख्यादेखील तितकीच आहे. मी जरी मराठी आणि हिंदी या दोन्ही इंडस्ट्रीत काम केले असले तरी एक कलाकार म्हणून प्रत्येकात एक शिस्त असते. त्याला मिळणाऱ्या चित्रपटाच्या यश-अपयशापेक्षा किंवा पुरस्कारांच्या पलीकडे तो काही तरी शोधत असतो. फिल्म इंडस्ट्री ही आपल्या परिवारासारखी आहे. आई एखाद्या वेळेस आपल्यावर रागावली तर तिचे प्रेम काय कमी होत नाही. असेच प्रेम, माया, जिव्हाळा या दोन्ही इंडस्ट्रीबद्दल आहे. या इंडस्ट्रीज माझ्यासाठी मायबाप आहेत. मला स्वत:ला वैयक्तिक असे वाटते की, आता मराठी फिल्म इंडस्ट्री उंचीवर पोहोचत आहे. या चित्रपटसृष्टीची प्रगती होत आहे. प्रत्येक मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रगत विचार समाजापर्यंत पोहोचत आहे. तसेच ओरिजनल स्क्रिप्ट, चांगले लेखक आता येथे दिसत आहेत. त्याचबरोबर संवेदनशील लिखाणदेखील पाहावयास मिळत आहे. सातत्याने वेगवेगळे प्रयोगदेखील घडत आहेत. जिसे ढुढँता हू, मै हर कही, जो कभी मिली मुझे है नही, मुझे जिसके प्यार पर हो यकीन, ओ लडकी है कहाँ ‘दिल चाहता है’ या बॉलीवूड चित्रपटाच्या गाण्यातून सैफ अली खान या स्टारसोबत अ‍ॅज मराठी गर्ल म्हणून सोनाली कुलकर्णीने नितांतसुंदर अभिनय केला. ‘दिल चाहता है’सोबतच ‘मिशन कश्मीर’, ‘सिंघम’, ‘वेलडन अब्बा’, ‘द कॅम्प’, ‘लव खिचडी’, ‘शॅडो’ असे अनेक हिंदी सुपरहिट चित्रपट सोनालीच्या नावावर आहेत. त्याचबरोबर ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘देऊळ’, ‘पुणे ५२’, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘काटा रुते कोणाला’ यांसारख्या मराठी चित्रपटांतही दमदार अभिनय केला. चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी जागा निर्माण करणारी सोनाली ‘सीएनएक्स सेलीब्रिटी रिपोर्टर’ म्हणून आपले मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभव शेअर करत आहे. निर्माता-दिग्दर्शकांनी रीलीज डेटबाबत चर्चा करावी मराठी चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होत असताना चित्रपटांची संख्याही वाढली आहे. एकाच दिवशी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र, त्याचा फटका अनेक चित्रपटांना बसतो. यासाठी निर्माता-दिग्दर्शकांनी एकमेकांत संवाद व चर्चा करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी फक्त चित्रपट महामंडळाची नसून मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांचीदेखील आहे. मराठी चित्रपटांना आणखी उंचीवर पोहोचविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे रेग्युलेशनदेखील आवश्यक आहे. बॉलीवूडमधील स्टार्सही एकमेकांच्या चित्रपटाला फटका बसू नये, यासाठी चित्रपटाची रीलीज डेट पुढे ढकलू शकतात तर मराठी कलाकार का नाही? हा बदल जर झालाच तर त्याचा फायदा मराठी इंडस्ट्रीला नक्कीच होईल. ग्रामीण भागातील थिएटर्सची संख्या वाढावी मराठी चित्रपट शहरी प्रेक्षकांबरोबरच गावोगावी पोहोचावा, यासाठी कलाकार प्रमोशनसाठी प्रत्यक्ष त्या गावात जाऊन प्रेक्षकांना भेटतात. तेथील रसिक कलाकारांनादेखील आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची संधी मिळते. जास्तीत जास्त प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत आणण्यासाठी कलाकार प्रयत्नशील असतात. मात्र, त्यासाठी ग्रामीण भागातील थिएटर्सची संख्या वाढविणे आवश्यक आहे.

Celebrity Reporter : Sonali Kulkarni

शब्दांकन : बेनझीर जमादार