छोटे सुरवीर” या कार्यक्रमाच्या ऑडीशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक मध्ये ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद दिला. मुलांचा उत्साह आणि त्यांची तयारी वाखाणण्याजोगी होती. सगळीच मुलं प्रचंड तयारीने आली होती हे त्यांच्या गाण्यावरूनच कळत होते. कार्यक्रमाच्या ऑडिशन्समध्ये खूप मुलांनी सहभाग घेतला. सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या मुंबई केंद्रावर पार पडलेल्या निवड चाचणीतून मुंबईतील मेगा ऑडीशन्ससाठी आठ स्पर्धक निवडण्यात आले. रसिका वायंगणकर, संगमेश्वरी मोरे, नेहा केणे, ओम देशमुख, अंशिका चोणकर, शिवानी स्वामी, हिमानी गढवी आणि श्रावणी वागळे यांची निवड झाली आहे तर ठाण्यामधून गौरी अमृतकर, मिथिला माळी, ओंकार कानिटकर, राजयोग धुरी, सई जोशी, तनिष्का पोवळे,विश्वजा जाधव यांची निवड झाली आहे. औरंगाबादमधून रोहन देशपांडे, सक्षम सोनावणे, सायली टाक, श्रीधर पानसरे, रागिणी शिंदे यांची निवड झाली आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे. कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदसत्यात आहे.
ऑडिशन्सला आलेल्या बऱ्याच स्पर्धकांनी त्यांच्या उत्तम सादरीकरणामुळे मने जिंकली परंतु या निवड चाचणीमधून निवड झालेल्या काही स्पर्धकांना मुंबईला येऊन मेगा ऑडिशन्स मध्ये त्यांचे गाणे सादर करण्याची संधी मिळाली. सूर नवा ध्यास नवाचे मागील पर्व हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले त्या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. हे पर्व छोटे सुरवीर गाजवणार हे नक्की. या बालगोपाळांचे सुरेल गाणं ऐकायला संपूर्ण महराष्ट्र आतूर आहे.