Join us

अजय देवगण-तब्बूची रोमँटिक केमिस्ट्री ३० वर्षांनंतर पुन्हा पडद्यावर, ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:23 IST

अजय देवगण आणि तब्बूच्या आगामी 'औरो मे कहा दम था' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बू (Tabu) ही बॉलिवूडमधली ऑल टाईम सुपरहिट जोडी. 'दृश्यम' मध्ये तब्बूने पोलिस अधिकारीची भूमिका साकारली होती तर अजय देवगणने सामान्य कुटुंबातील कर्ता पुरुषाची. पण आता अजय आणि तब्बू यांची रोमँटिक लव्हस्टोरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दोघांनी वयाची पन्नाशी पार केली आहे पण आजही त्यांच्या अभिनयाला आणि केमिस्ट्रीला तोड नाहीए.

अजय देवगण आणि तब्बूच्या आगामी 'औरो मे कहा दम था' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा पीरियड ड्रामा आहे. यात दोघांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. स्पेशल 26 फेम दिग्दर्शक नीरज पांडे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात अजय देवगण आणि तब्बूची लव्हस्टोरी फ्लॅशबॅकमध्ये असणार आहे. तर शंतनू माहेश्वरी आणि सई मांजरेकर ही तरुण फ्रेश जोडीही मुख्य भूमिकेत असणार आहे. यामध्ये अॅक्शन, रोमान्स आणि सस्पेन्सचा तडका पाहायला मिळणार आहे.

'औरो मे कहा दम था' हा २३ वर्षांपासून चालत आलेला रोमँटिक ड्रामा आहे जो 2000 ते 2023 या काळातला आहे. सिनेमातील मुख्य कलाकारांशिवाय अभिनेता जिमी शेरगिलचीही भूमिका आहे. ५ जुलै रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

अजय देवगण आणि तब्बू यांनी 'हकीकत','थक्षक','गोलमाल अगेन','दे दे प्यार दे','विजयपथ','दृश्यम' यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :अजय देवगणतब्बूसिनेमादिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट