प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन यांनी त्यांच्या भारत दौऱ्याचा पहिला दिवस अर्थात रविवार मुंबईत घालवला. रविवारी रात्री या ‘रॉयल कपल’साठी ‘रॉयल डिनर’ आयोजित करण्यात आले. या डिनरला बॉलीवूडमधील शाहरुख खान, ऐश्वर्या रॉय, करण जोहर, अर्जुन कपूर, आलिया भट्ट, जॅकलिन फर्नांडिस, फरहान अख्तर, अदिती राव हैदरी, परिणीती चोप्रा व सोनम कपूर आदी स्टार्सनी हजेरी लावली. शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित यांच्यासह नॉवेलिस्ट शोभा डे यांच्याबरोबरच सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन हेही आपल्या पत्नीसह या डिनरला उपस्थित होते. निळ्या रंगाच्या आउटफिटमधील हसतमुख केटने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला संबोधित करताना प्रिन्स यांनी ‘नमस्ते’ने भाषणास सुरुवात केली आणि ‘धन्यवाद’ म्हणून भाषण संपवले. या ‘रॉयल डिनर’मध्ये एकापेक्षा एक ‘रॉयल डिशेस’ बनवण्यात आल्या होत्या. शाही कोरमापासून शरीफा कुल्फीपर्यंतचे मेन्यू या ठिकाणी होते. दाल लंगरवली, पनीर शाही कोरमा, फ्रेश मिंट रायता, लखनऊ वेज बिर्याणी आदी डिशेसही होत्या. नॉनवेजमध्ये आजवानी मछली होती. प्रिन्स विलियम आणि केट मिडलटन यांनी हे रॉयल डिनर मनसोक्त एन्जॉय केले.
‘रॉयल डिनर’साठी अवतरले बॉलीवूड
By admin | Published: April 13, 2016 1:39 AM