Join us

Avatar 2 Box Office Collection Day 2: ‘अवतार 2’ सुसाट! भारतीय प्रेक्षक पडले प्रेमात, पहिल्या दोनच दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 11:36 AM

Avatar 2 Box Office Collection Day 2: कोरोना महामारीनंतर पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करणारा ‘अवतार 2’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. 

Avatar 2 Box Office Collection Day 2:  हॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट ‘अवतार 2’ अर्थात ‘अवतार :  द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water )  रिलीज झाला आहे. 2009 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग रिलीज झाला होता. तेव्हापासून प्रेक्षक या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची प्रतीक्षा करत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली आणि ‘अवतार 2’ प्रेक्षकांच्या भेटीस आला. तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘अवतार’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत छप्परफाड कमाई कली होती. ‘अवतार 2’ सुद्धा जगभर धुमाकूळ घालतोय.

भारतात या चित्रपटाने पहिल्या दोनचं दिवसांत जबरदस्त कमाई केली आहे. ‘अवतार 2’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतात तब्बल 41 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी कमाईचा हा आकडा 45 कोटींवर पोहोचल्याचं म्हटलं जात आहे. अर्थात हे प्राथमिक आकडे आहेत. यात एक-दोन कोटींचा फरक पडू शकतो. याचसोबत ‘अवतार 2’ने दोन दिवसांत  भारतात 86 कोटींचा पल्ला गाठला आहे.

‘अवतार 2’ भारतात 3800 स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे. रोज याचे 17000 शो आहेत. या सिनेमाला मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद बघता, पहिल्या तीनच दिवसांतच हा चित्रपट 125 ते 130 कोटी इतकी कमाई करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.  कोरोना महामारीनंतर पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करणारा ‘अवतार 2’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. 

2009 मध्ये ‘अवतार’ रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॉक्स आफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.  हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अगदी या चित्रपटानं  ‘टायटॅनिक’लाही मागे टाकलं होतं. अवघ्या सहा आठवड्यांत ‘अवतार’ नं  1 अब्ज 85 डॉलरची कमाई केली होती. ‘अवतार’ ला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते. ऑस्करसाठी देखील या चित्रपटाला नामांकन मिळालं आहे. हा चित्रपट 23 कोटी डॉलरच्या बजेटमध्ये बनवला गेला होता, ज्याला तेव्हाचा सर्वात महागडा चित्रपट म्हटलं गेलं होतं. आता याचा सीक्वल अर्थात ‘अवतार 2’ एकूण किती कमावतो, ते बघूच.

 

आणखीही पार्ट येणार...‘अवतार 2’ रिलीज झालाये. त्याचबरोबर ‘अवतार 3’ चं शूटिंगही जवळपास संपलं आहे. ‘अवतार 3’ साठी 20 डिसेंबर 2024 चा स्लॉट निश्चित करण्यात आला आहे. यानंतर ‘अवतार 4’  डिसेंबर 2026 आणि ‘अवतार 5’  डिसेंबर 2028 ला रिलीज होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :हॉलिवूडसिनेमाबॉलिवूड