Join us

‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ची घोडदौड सुरुच; भारतात गाठणार ४०० कोटींचा आकडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 3:50 PM

‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ची बॉक्स आॅफिसवरची ही घोडदौड बघता, एकट्या भारतात हा चित्रपट ४०० कोटींची कमाई करेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

ठळक मुद्देवर्ल्डवाईड कमाईबद्दल सांगायचे झाल्यास या चित्रपटाने आत्तापर्यंत ८३८१ कोटीं रूपयांपर्यंत मजल मारली आहे.

‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ या हॉलिवूडपटाने जगभरात कमाईचे सगळे विक्रम तोडण्याचा धडाका लावला आहे. गत आठवड्यात जगभर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. भारतीय प्रेक्षकही याला अपवाद नाहीत. पहिल्या तीनच दिवसांत ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ने भारतात १३० कोटींची कमाई करून एक विक्रम रचला. ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ची बॉक्स आॅफिसवरची ही घोडदौड बघता, एकट्या भारतात हा चित्रपट ४०० कोटींची कमाई करेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.पहिल्या दिवशी या चित्रपटाने ५३.६० कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ५२.२० कोटींचा गल्ला जमवला. रविवारी तिसºया दिवशी ५२.८५ कोटींचा बिझनेस केला. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजे, गत सोमवारी या चित्रपटाने ३१.५ कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी २६.१० कोटी आणि काल बुधवारी सहाव्या दिवशी २८.५० कोटी कमावले. याचसोबत ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’च्या भारतातील एकूण कमाईचा आकडा २४४.३० कोटींवर पोहोचला. जाणकारांच्या मते, येत्या आठवड्यांत हा चित्रपट सहजरित्या ४०० कोटींपर्यंतचा बिझनेस करू शकतो.

वर्ल्डवाईड कमाईबद्दल सांगायचे झाल्यास या चित्रपटाने आत्तापर्यंत ८३८१ कोटीं रूपयांपर्यंत मजल मारली आहे. हा एक विक्रम आहे. ‘अवतार’ या हॉलिवूडपटाला मागे टाकत ‘अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम’ हा चित्रपट लवकरच जगात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याच्या तयारीत आहे.रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर, बरी लार्सन, क्रिस हेम्सवर्थ, क्रिस इवांस यांच्या शानदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाला जगभरातील समीक्षकांनी दाद दिली. प्रेक्षकांनाही या सुपरहिरो सीरिजने प्रेमात पाडले. आता हा चित्रपट आणखी कोणत्या विक्रमांवर नाव कोरतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

टॅग्स :अ‍ॅवेंजर्स- एंडगेम