गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या हॉलिवूड सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते तो Avengers Endgame धडाक्यात रिलीज झाला आहे. मार्व्हलच्या Avengers सीरिजची जगभरातील चाहत्यांमध्ये किती क्रेझ आहे हे सोशल मीडियावर एक नजर टाकली तरी बघायला मिळेल. Avengers सीरिजचा हा शेवटचा सिनेमा असल्याने Endgame ची अधिक जास्त उत्सुकता आहे. या सिनेमात प्रत्येक Avengers हा थॅनोसला मारण्यासाठी धडपडत आहे.
थॅनोस या सिनेमातील एक असा व्हिलन असा ज्याला या ब्रम्हांडाला नष्ट करायचं आहे आणि ब्रम्हांडाला वाचवण्यासाठी Avengers आपल्या जीवाची बाजी लावतात. थॅनोसची क्रेझ पाहून गुगलनेही काहीतरी भन्नाट असं केलं आहे. गुगलची ही भन्नाट आयडिया पाहून तुम्हीही खूश व्हाल.
गुगलने थॅनोसच्या हातासोबत एक ट्रिक केली आहे. म्हणजे थॅनोसच्या हातावर क्लिक करताच स्क्रीनवर समोर दिसत असलेल्या गोष्टी नष्ट होऊ लागतात. तुम्ही हे सहज करु शकता.
काय कराल?
१) सर्वातआधी गुगलवर जाऊन इंग्रजीमध्ये Thanos असं सर्च करा.
२) तुमच्यासमोर याच्याशी संबंधित सर्व आर्टिकल येतील. आता पेजच्या उजवीकडे बघा. तिथे तुम्हाला थॅनोसचा हात दिसेल. त्यावर क्लिक करा.
३) जसेही तुम्ही या हातावर क्लिक कराल एखाद्या जादूप्रमाणे समोरील आर्टिकल गायब होऊ लागतील.
याने होणार काही नाही. पण एक गंमत म्हणूण गुगलने हे केलं आहे. म्हणजे चाहत्यांची क्रेझ पाहता गुगलने हे केलं आहे.