Join us

‘मांझी’ला मिळाले सरासरी यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2015 12:22 AM

गेल्या आठवड्यात ‘मांझी-ए माऊंटेन मॅन’ आणि ‘आॅल इज वेल’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील मांझी चित्रपटाला सरासरी प्रतिसाद मिळाला. तर ऋषी कपूर, अभिषेक बच्चनसारखे

गेल्या आठवड्यात ‘मांझी-ए माऊंटेन मॅन’ आणि ‘आॅल इज वेल’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील मांझी चित्रपटाला सरासरी प्रतिसाद मिळाला. तर ऋषी कपूर, अभिषेक बच्चनसारखे कलाकार असूनही ‘आॅल इज वेल’ची अवस्था मात्र वाईट होती. ‘ओ माय गॉड’सारखा चित्रपट बनविणाऱ्या उमेश शुक्ला यांचा नवा चित्रपट ‘आॅल इज वेल’ बॉक्स आॅफीसवर काहीही चांगले घडविण्यात अपयशी ठरला आहे. त्याची सुरवातच वाईट झाली व पहिल्या तीन दिवसांतील त्याची कमाईदेखील उल्लेखनीय नव्हती. प्रदर्शित झालेल्या दिवशीही त्याचा गल्ला ३ कोटींच्या जवळपासच व अपेक्षेपेक्षा खूपच कमी होता. पहिल्या विकेंडचा त्याचा गल्ला १२ कोटींच्या जवळपासचा होता, तरी तो चित्रपट पाहून येणाऱ्यांपैकी बहुतांश जण फारच निराश झाल्याचे दिसत होते. याच एका कारणामुळे सोमवारी ‘आॅल इज वेल’ चे पाय लटपटू लागले व तो यावर्षीच्या सगळ््यात मोठ्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत जाऊन बसला.‘आॅल इज वेल’सोबतच प्रदर्शित झालेला केतन मेहतांचे दिग्दर्शन असलेल्या ‘मांझी-ए माऊंटेन मॅन’चे प्रसारमाध्यमांतून बरेच कौतुक झाले तरीही बॉक्स आॅफीसवर मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दिवशी त्याचा गल्ला १.४० कोटींचा होता. शनिवारी २.३५ कोटी तर २.७० कोटींचा गल्ला रविवारी मिळाला. या हिशेबाने पहिल्या तीन दिवसांत ‘मांझी’ची कमाई ६.४५ कोटी रुपयांची होती. ‘मांझी’च्या गल्ल्याचा हिशेब करताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की ‘मांझी’ प्रदर्शित होण्याच्या आधी काही दिवस त्याची पायरेटेड सीडी बाजारात आली होती. यामुळे चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम झाला.करण जोहर कंपनीचा ‘ब्रदर्स’ पहिल्या विकेंडला ५० कोटी रुपयांपेक्षाही जास्त कमाई करून आपली सुरवात बळकट करणारा ठरला. जाणकारांचे म्हणणे असे की, ‘आॅल इज वेल’च्या निराशाजनक सुरवातीचा फायदा ‘ब्रदर्स’ला झाला. त्यामुळेच दुसऱ्या विकेंडपर्यंत (म्हणजे १० दिवसांत) ‘ब्रदर्स’ने ७८ कोटी रुपयांचा व्यवसाय करण्यात यश मिळविले. या व्यवसायामुळे ‘ब्रदर्स’ने हिट चित्रपटांच्या यादीत स्थान पटकावले. अनंत महादेवनच्या ‘गौर हरी दास’चे बॉक्स आॅफीसवरील भवितव्य काही विशेष नव्हते. येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांत कबीर खानच्या ‘फँटम’चे नाव मोठे आहे. ‘बजंरगी भाईजान’नंतर कबीर खानचा हा पहिला चित्रपट. त्यात त्याने २६/११ चा मुंबई हल्ला आणि पाकिस्तानी दहशतवादी कारवायांचा विषय घेतला आहे. या अ‍ॅक्शन, थ्रिलर चित्रपटात सैफ अली खान व कॅटरिना कैफ ही जोडी आहे. याबरोबरच ‘कौन कितने पानी मे’ प्रदर्शित होणार असला तरी सगळ््यांना उत्सुकता आहे ती ‘फँटम’ची.