Join us

"विक्रम भट यांचा व्हिडिओ कॉल आला अन्..." दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून शॉक झाली अविका गोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 16:09 IST

अविका नेहमीच तिच्या बोल्ड आणि बिंधास्त अॅटिट्यूडमुळे चर्चेत असते.

टेलिव्हिजनवरील 'बालिका वधू' मालिकेतून आनंदी या नावाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) आता खूपच बोल्ड झाली आहे. तिचा संपूर्ण लुकच पालटला आहे. बोल्ड फोटोशूटमुळे ती कायम चर्चेत असते. अनेक टीव्ही शो, म्युझिक अल्बम आणि साऊथ सिनेमांमध्ये काम केल्यानंतर आता अविका मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. विक्रम भटचासिनेमा '1920:द हॉरर ऑफ हार्ट' मध्ये ती मुख्य भूमिका साकारत आहे.

अविका नेहमीच तिच्या बोल्ड आणि बिंधास्त अ‍ॅटिट्यूडमुळे चर्चेत असते. एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने तिचा प्रवास उलगडला. यावेळी 1920 सिनेमा तिच्यापर्यंत कसा आला याचं उत्तर ऐकून सर्वच शॉक झाले. अविका म्हणाली, "मला मॅनेजरने सांगितले की विक्रम भट  (Vikram Bhat) यांचा कॉल आहे. त्यांना बोलायचं आहे. माझ्यासाठी हे सरप्राईजच होतं. मला वाटलं कोणत्या ऑडिशनसाठी फोन आला असावा. तिने फोन घेतला आणि विक्रम भट जे बोलले ते ऐकून तिला धक्काच बसला. "

ती म्हणाली, "विक्रम भट यांनी मला व्हिडिओ कॉलवर सिनेमाची पूर्ण स्क्रीप्ट ऐकवली. स्क्रीप्ट झाल्यावर मला वाटलं की ऑडिशनसाठी विचारतील. पण तसं झालं नाही.त्यांनी मला थेट फिल्मच ऑफर केली. 1920 मध्ये मी मुख्य अभिनेत्री म्हणून काम करावं अशी त्यांची इच्छा असल्याचं ते म्हणाले.माझ्यासाठी हे शॉकिंग होतं इतकी मोठी संधी तेही व्हिडिओ कॉलवर..."

1920:द हॉरर ऑफ हार्ट' ही फॅमिली ड्रामा हॉरर फिल्म आहे.कृष्णा भट यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. कृष्णा भट फिल्ममेकर विक्रम भट यांची मुलगी आहे आणि या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. फिल्मची पटकथा महेश भट आणि विक्रम भट यांनी लिहिली आहे. 23 जून रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अविका गौरविक्रम भटसिनेमा