Join us

अविनाश नारकरांच्या नावावर पहिलंच घर, ऐश्वर्या यांनी दाखवली झलक; म्हणाल्या, "सतत दुसऱ्यांची स्वप्न..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:59 PM

नवीन घरातून ऐश्वर्या नारकर यांनी व्हिडिओ शेअर केला.

अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) मराठीतलं एव्हरग्रीन कपल. नाटक, मालिकांमध्ये दोघांनी अनेक भूमिका साकारल्या. दोघंही इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगातही त्यांची चर्चा असते. या गोड कपलचे अनेक रील्स व्हायरल होत असतात. नुकतंच दोघांनी नवीन घर घेतलं. अविनाश नारकर यांच्या नावावर हे पहिलंच घर आहे असा खुलासा ऐश्वर्या यांनी पोस्टमधून केला.

नवीन घरातून ऐश्वर्या नारकर यांनी व्हिडिओ शेअर केला. यात त्यांनी घराची झलक दाखवली. त्या लिहितात, "घर.... अविच्या नावावरचं पहिलं घर! सतत दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा विचार. राहत्या घरावर पण माझंच नाव...अगदी घरातल्या ताट - वाटीवर सुद्धा . आज खूप छान वाटतंय. तुझी न बाळगलेली सर्व स्वप्न पूर्ण होवोत. हॅपी होम!"

इतक्या वर्षात अविनाश नारकर यांचं स्वत:च्या नावावर घरंच नव्हतं. ते आज झालं असल्याने दोघांनाही विशेष आनंद होतोय. पुण्यात त्यांनी हे नवीन घर घेतलं आहे. मराठीतील इतर कलाकारांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. अविनाश नारकर यांनी कमेंट करत लिहिले, 'तुझी खंबीर साथ... आणि तु घट्ट पकडलेला हात... यापलिकडे खरं तर काहीही नकोय....आणि खरं सांगू... तुझ्या नवापाठोपाठ माझं नाव येतं ही माझ्यासाठी कायम आभाळ ठेंगणं करणारी गोष्ट आहे."

ऐश्वर्या नारकर सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत दिसत आहेत. यात त्या खलनायिका आहेत. तर अविनाश नारकर 'कन्यादान' मालिकेत काम करत होते. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने निरोप घेतला.

टॅग्स :अविनाश नारकरऐश्वर्या नारकरमराठी अभिनेतासोशल मीडियासुंदर गृहनियोजन