ऑल्ट बालाजी आपल्या गुंतवून ठेवणाऱ्या कथा आणि अद्वितीय संकल्पना असलेल्या ओरिजनल्ससाठी प्रसिद्ध आहे. कंटेंटची क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर आणि व्हिक्टर टॅंगो एन्टरटेनमेंटचे संस्थापक वैभव मोदी आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र काम करणार आहेत. हा प्रोजेक्ट येमेनच्या २०१५ च्या युद्धावर आधारित आहे.
पहिल्यांदाच, भारतीय प्रेक्षक भारताच्या सगळ्यात मोठ्या कारवाईची कथा पडद्यावर पाहतील जेव्हा येमेन युद्धात भरडला जात होता. प्रसंगावधान राखून घेतल्या गेलेल्या निर्णयांची आणि वर्दितल्या माणसांच्या शौर्याची ही कथा आहे. जेव्हा त्यांनी भारतीय आणि परदेशी नागरिकांना वाचवण्यासाठी आणि त्यांची सुटका करण्यासाठी आपल्या कर्तव्याच्याही पलीकडे जाऊन प्रयत्नांची शिकस्त केली. प्रचंड मानसिक आणि शारीरिक दबावाखाली राहून बचाव सैन्याच्या तुकडीने जीवनमरणाच्या सीमारेषेवर असताना त्वरित आणि योग्य निर्णय घेतले. त्यावेळी एखाद्याला जहाजावर घेण्यास नकार देणे म्हणजे त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यासारखे होते आणि होकार देणे म्हणजे एक चुकीचा माणूस आपल्यात घेणे जो त्या सर्वांना मारून टाकू शकतो. अशा परिस्थितीत भारताने जवळपास सहा हजार भारतीय आणि तेवढ्याच संख्येत परदेशी नागरिकांची यशस्वी सुटका केली. या संकटावर भारताने दिलेली ही प्रतिक्रियानागरिकांच्या सुरक्षेसाठी सक्षम आणि कौतुकासपद होती.दहा भागांची ही मिलिटरी नाट्याची मालिका अल्टबालाजीच्या आगामी मालिकांपैकी एक मोठी मालिका आहे. बचाव मोहिमेवर आधारित आहे या कथेत आपले सैनिक आपले मिशन यशस्वी करण्यासाठी, विजयी होण्यासाठी आपला जीव कसा धोक्यात घालतात अशा दुर्मिळ क्षणांची कहाणी आहे. एकता कपूर आणि वैभव मोदी गेल्या वर्षभरापासून ही कथा विकसित करण्यावर काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या घटनांवर संशोधन केले आहे जे सैनिकांच्या असाधारण योगदानासोबातच युद्धात फसलेल्या भारतीय नागरिकांवर झालेले परिणाम आणि यातनांना कारणीभूत आहेत. याबद्दल एकता कपूरने सांगितले, यापूर्वी कधीही हाताळल्या गेल्या नाहीत अशा अनोख्या कथा आणि संकल्पना मांडण्याचा प्रयत्न आम्ही ऑल्टबालाजीमध्ये निरंतर करीत असतो. भारतीय प्रेक्षकांनी येमेन बचाव मोहिमेवर कधीही कोणतीही गोष्ट पाहिलेली नाही त्यामुळे मला ही कथा ऑल्टबालाजीवर सादर करताना खूप आनंद झाला आहे. वैभव माझा एक अतिशय जुना मित्र आहे. एखादी कथा सगळ्यांसमोर येण्याच्या प्रतिक्षेत असते. असा कथा सांगण्याच्या त्याच्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. आम्ही हे आज जाहीर करीत असलो तरी आम्ही गेले वर्षभर ह्यावर संशोधन आणि विकास करत आहोत. जेव्हादोन व्यक्ती एकत्र काम करीत असतात तेव्हा त्यांच्या विचारधारा जुळणे महत्वाचे आहे. येथे, आम्हाला दोघांनाही आमच्या कथानकाच्या क्षमतेवर विश्वास आहे. आम्हाला अशी कथा दाखवायची आहे जी प्रेक्षकांना खिळवून ठेवेल. हा आमच्यासाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि आम्ही दोघेही काहीतरी अद्वितीय घडवण्यासाठी एकत्र काम करतो आहोत.