एकेकाळी या अभिनेत्रीने आपल्या घायाळ करणा-या सौंदर्याने सा-यांची पसंती मिळवली होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री आयशा टाकिया ही एकेकाळची आघाडीची नायिका मानली जायची. 'टार्जन द वण्डर कार','वांटेड', 'सलाम-ए-इश्क', 'कॅश' यासारखे अनेक हिट सिनेमा तिने दिले. 2011 मध्ये 'मोड़' हा शेवटचा सिनेमा तिने केला. त्यानंतर 2009 मध्ये फरहान आजमीसह लग्नबंधनात अडकत तिच्या आयुष्यात बिझी झाली. अगदी कमी वेळात तिने बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्मा केले होते.
आयशा आता सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते. तिचे नवीन फोटो ती सोशल मीडियालर शेअर करत असते. मात्र तिचा लूक पाहून तुम्हाला ही आयशाच आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. आणखी सुंदर दिसण्यासाठी आयशाने फेशिअल सर्जरी केली. या सर्जरीचा उलट परिणाम म्हणजे तिचा चेहरा आणखी खराब झाल्याचे पाहायला मिळत आहे. चाहत्यांनाही तिचा हा लूक जराही आवडला नाही.
अनेकांनी यावरून तिला ट्रोलही केले. अर्थात सर्जरी केल्याचे आयशा नाकारत राहिली. पण तिच्या फोटोंनी सगळे काही स्पष्ट केले.वयाच्या चौथ्या वर्षी आयशाने मॉडेलिंग सुरु केले. वयाच्या १५ व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चूनर उड उड जाऐ’ या म्युझिक अल्बममध्ये ती झळकली. या अल्बममुळे आयशा अचानक प्रकाशझोतात आली होती.