Sania-Shoaib divorce : पाकिस्तानी क्रिकेटपटु शोएब मलिक आणि पाकिस्तानी मॉडेल आएशा उमर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. सानियाचे सोशल मीडियावरील पोस्टही कोड्यात टाकणारे होते. मात्र या चर्चा अफवा ठरल्या जेव्हा सानिया शोएबच्या मिर्झा मलिक या pakistani show 'पाकिस्तानी शो' ची घोषणा झाली. हे कपल सध्या हा शो होस्ट करत आहेत. यामध्ये अनेक पाकिस्तानी कपल सहभागी होत आहेत. मग सानिया शोएबच्या या घटस्फोटाच्या अफवा रंगल्या त्या एका पाकिस्तानी मॉडेलमुळे ती म्हणजे 'आयेशा उमर'. आता या सर्व चर्चांवर आयेशा उमरनेच खुलासा केला आहे.
शोएब मलिक सोबतच्या नात्यावर काय म्हणाली आयेशा उमर ?शोएब आणि आयेशाचे २०२१ मध्ये केलेले स्विमींग पुलमधले एक फोटोशुट चर्चेत आले होते. यामुळे शोएब आणि आयेशाच्या नात्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. हे दोघेही लग्न करणार अशीही चर्चा होती. या अफवांमुळे आयेशाला जोरदार ट्रोलही करण्यात आले होते. आता आएशाने या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे.
एका इंटरनेट युझरने आएशाला विचारले, 'तुमच्या दोघांचा Marriage लग्न करण्याचा प्लॅन आहे का?' यावर आएशा उमर म्हणाली, ' नाही, अजिबात नाही. शोएब आणि सानिया यांचे लग्न झाले आहे. ते खुप खुश आहेत. मी दोघांचाही आदर करते. शोएब माझा चांगला मित्र आहे आणि आम्हाला एकमेकांची काळजी आहे. या जगात अशीही नाती असतात.'Twitter ट्विटरवर झालेले हे संभाषण आता खुपच व्हायरल होत आहे. अखेर आएशाने या सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे.
याशिवाय शोएब मलिकने एका Interview मुलाखतीत यावर स्पष्टीकरण दिले होते. या Phototshoot फोटोशुटवर सानियाची काय प्रतिक्रिया होती असे विचारले असता तो म्हणाला, 'माझ्या पत्नीने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती तिथे नाहीच असे तिने दाखवले.'
आएशा ही पाकिस्तानच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेक पाकिस्तानी शो मध्ये आली आहे. प्रसिद्ध पाकिस्तानी मालिका जिंदगी गुलजार है यामध्येही तिने काम केले आहे. याशिवाय तिने 'लव मे गेम' आणि 'मै हू शाहीद आफ्रिदी' या सिनेमांमध्येही काम केले आहे.