Join us

'दांडिया नाईट्स'मध्ये आयुष शर्मा आणि वरीना हुसेन यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 06:30 IST

'दांडिया नाईट्स'मध्ये आयुष शर्मा आणि वरीना हुसेन 'लवयात्री' या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देआयुष आणि वरीना यांनी 'छोगडा तेरा' या गाण्यावर केले नृत्य आयुष आणि वरीना यांनी 'लवयात्री' सिनेमाचे केले प्रमोशन

स्टार प्लस वाहिनी आजवर कधीही न पाहिलेला आणि सेलिब्रिटींचा सहभाग असलेला एक सर्वात भव्य कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांपुढे येत आहे. या कार्यक्रमाचे नाव आहे 'दांडिया नाईटस'. नवरात्री आणि दसरा या सणांचा हा उत्सव असून यात टीव्ही आणि चित्रपटांतील अनेक दिग्गज सेलिब्रिटी गरबा आणि दांडिया यांचा आनंद लुटतील. 

यंदाच्या या 'दांडिया नाईट्स'मध्ये आजच्या घडीचे बॉलीवूडचे दोन आवडते आणि लोकप्रिय कलाकार आयुष शर्मा आणि वारिना हुसेन हे 'लवयात्री' या आगामी चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना आयुष शर्मा म्हणाला, 'दांडिया नाईटसमध्ये सहभागी झाल्यावर वरीना आणि मला फारच छान अनुभव आला. नवरात्रींचा इतका भव्य उत्सव मी आजवर पाहिला नव्हता. तसेच इतक्या विविध प्रकारे गरबा खेळला जातो, याचीही मला कल्पना नव्हती. पण आम्हाला त्यात भाग घेता आला आणि अनेक टीव्ही सेलिब्रिटींबरोबर आम्हाला संवाद साधता आला, त्याचा मला आनंद वाटतो. प्रेक्षकांनाही त्यातील आमचा गरबा आणि दांडिया नृत्य आवडेल, अशी मला अपेक्षा आहे.''दांडिया नाईट्स' या कार्यक्रमात आयुष आणि वरीना यांनी आपल्या आगामी चित्रपटातील 'छोगडा तेरा' या गाण्यावर नृत्य केले. स्टार प्लसवरील दांडिया नाईटस या सोहळ्यात विविध सेलिब्रिटींनी केलेली वेधक नृत्य आणि भव्य सोहळा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. 

टॅग्स :लवरात्रिआयुष शर्मावरिना हुसैन