Join us

बॉलिवूडचा विकी उर्फ आयुषमान खुरानाने खाकी वर्दीचे मानले आभार तेही मराठीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 4:58 PM

आयुषमान खुराणाने ट्विट करीत मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत.

कोरोना व्हायरसचा भारतात फैलाव झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत. लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, घरात असलेल्या लोकांना काही गरज असेल तर मदत व्हावी यासाठी पोलिस दिवसातील कित्येत तास काम करत आहेत. काम करताना कोरोनाची लागण देखील होऊ शकते याची त्यांना चांगली कल्पना असली तरी ते आपले काम खूपच चांगल्याप्रकारे करत आहेत. त्यांच्या या कामासाठी बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणाने त्यांचे आभार मानले आहेत. तेही मराठीमध्ये त्याने पोलिसांचे आभार मानले आहेत.

आयुषमान खुराणाने ट्विट करीत मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याने ट्विटमध्ये म्हटले की, तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी मी निशब्द झालो आहे. परंतु मी आज तुम्हाला हृदयापासून धन्यवाद देत आहे. जय हिंद.

मुंबई पोलिसांनी त्यांचा काम करतानाचा अनुभव एका व्हिडिओद्वारे रेकॉर्ड केला असून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला देखील आयुषमानने रिट्वीट केले आहे.

मुंबई पोलिसांचे ट्विट नेहमीच चर्चेत येत असते. त्यात त्यांनी आयुषमान खुराणाला खूप रंजक पद्धतीने आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं की, धन्यवाद विकी. आम्ही मुंबईकरांना ज्यादा सावधान ठेवण्यासाठी सर्व काही करू.

आयुषमान शिवाय अजय देवगणनेदेखील पोलिसांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :आयुषमान खुराणामुंबई पोलीसपोलिस