बॉलीवूड स्टार आयुषमान खुराणा हा लोकप्रिय अभिनेता आहे याशिवाय तो आपल्या हृदयस्पर्शी कवितांसाठीही प्रसिद्ध आहे. सध्या आयुषमानने लिहिलेली एक कविता इंटरनेटवर चांगलीच गाजतेय. भारताच्या T20 वर्ल्ड कप विजयावर समर्पित त्याची ही कविता अल्पावधीतच २० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवत सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. आयुषमानने लिहिलेली हृदयस्पर्शी कविता पुढीलप्रमाणे.
आयुषमानने टीम इंडियासाठी लिहिली खास कविता
आयुषमानने टीम इंडियाची निळी जर्सी परिधान करुन खास कविता म्हटली आहे. आयुषमानची कविता अशी आहे की,''सेमी फाइनल में कोहली के मुंह से जब निकला था बेन स्टोक्स, तब तो आलोचको ने लगा दिए थे सारे चोक्स, इस फाइनल में दिखाई दिया कोहली ने अपना विराट रूप, समझो प्यारे, इतना ही तो है जीवन, छांव और धूप। पंड्या को भी पिछले कुछ महीने में बहुत कुछ कहा-सुनाया, लेकिन फाइनल में उसी ने तो जलवा दिखाया है। और मूछें हों तो हार्दिक जैसी हों, वर्ना न हों, और बॉलिंग हो तो फिर बुमराह जैसी हो वर्ना न हो, और अक्सर, मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करती हैं कि अगर मेरा कैच न पकड़ा गया होता तो क्या होता, होता है ब्रो होता है, मैच में सबका साथ होता है।''
इंडियाने टी २० वर्ल्डकप जिंकल्यावर आयुषमानची भावना
आयुषमानने ही सुंदर कविता लिहिण्याआधी त्याची भावना व्यक्त केलीय. आयुषमान लिहितो, "ज्या रात्री भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला, त्या रात्री मी खूप वेळ झोपू शकलो नाही. हा विजय खूप वैयक्तिक वाटला. कारण आपलं हृदय भारतासाठी उत्कटतेने धडधडतं आणि हा विजय खूप दिवसांनी आला होता. त्यामुळे, जेव्हा दुसऱ्या दिवशी उठलो, तेव्हा मला टीमसाठी, त्यांच्या निर्धारासाठी, देशाला सर्वोच्च गौरव मिळवण्यासाठी काहीतरी लिहायचं होतं.”
आयुषमान पुढे म्हणतो, “जे काही मी लिहिलं, ते माझ्या मनातून सरळ बाहेर आलं आणि मला आनंद आहे की, ते भारतात आणि जगभरातल्या भारतीयांमध्ये एवढं गाजलं. आपण आपल्या विजयाच्या क्षणी एकत्रित होतो आणि ते खोलवर जाणवलं. आपल्या चित्रपटसृष्टीप्रमाणेच क्रिकेटला सुद्धा आपण एक धर्म मानतो. क्रिकेट हा भारतातील विविधतेचे खरे उदाहरण आहे . हा विजय त्या विविधतेचाही एक उत्सव होता. जेव्हा भारताने वर्ल्ड कप उचलला, तेव्हा तो एक अविस्मरणीय क्षण होता.”