ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) खुराणा लिखित आणि दिग्दर्शित कॉमेडी ड्रामा सिनेमा 'शर्माजी की बेटी' (Sharmaji Ki Beti) प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विभिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या तीन मध्यमवर्गीय महिलांच्या आकांक्षा, स्वप्नं आणि तरूणाईतील क्षण दाखवले आहेत. हा सिनेमा ताहिरा कश्यप खुराणासाठी खूप खास आहे कारण तिचे दिग्दर्शन असलेला पहिला सिनेमा आहे. तिचा नवरा आणि अभिनेता आयुषमान खुराणाला तिचे दिग्दर्शन खूप आवडले आणि त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कौतुक केले. तसेच संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.
आयुषमान खुराणाने त्याची पत्नी ताहिरा कश्यपसाठी इंस्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने पत्नी ताहिराच्या चिकाटी, जीवनाची आवड, काम आणि कुटुंबाप्रती समर्पण यांचे कौतुक केले आहे. आयुषमानने लिहिले, “तुमची दृढता, जीवनाबद्दलची तुमची आवड, तुमचे काम आणि तुमचे कुटुंब यामुळे तुमच्याकडून प्रेरणा मिळण्याची अनेक कारणे आहेत. तुम्ही स्पर्श करता त्या प्रत्येक गोष्टीत तुमचा आत्मा प्रतिबिंबित होतो आणि म्हणूनच शर्माजी की बेटी हा एक खास चित्रपट आहे.
त्याने पुढे म्हटले की, या चित्रपटाच्या प्रवासादरम्यान तू आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाचा सामना केला. कदाचित यामुळेच शर्माजी की बेटी ही हृदयस्पर्शी कथा आहे. आपल्या थिएटरच्या दिवसांपासून तू नेहमीच जन्मजात लेखक/दिग्दर्शक आहेस..ताहिरा कश्यप तू किती आश्चर्यकारक आहेस हे जगाने पाहण्याची वेळ आली आहे. खूप अभिमान वाटतो तुझा. शर्माजी की बेटीच्या संपूर्ण कलाकारांचे आणि क्रूचे अभिनंदन, आता @primevideoin वर प्रसारीत होत आहे.