Join us

कोण साकारणार वीर सावरकरांची भूमिका? या तीन अभिनेत्यांची नावांची आहे जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 10:24 AM

Swatantryaveer Sawarkar : महेश मांजरेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बायोपिक दिग्दर्शित करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चरित्रपटाचे शूटिंग हे लंडन, अंदमान आणि महाराष्ट्राच्या इतर भागात होणार आहे.

रूपेरी पडद्यावर आणखी एका जीवनपटाची अर्थात बायोपिकची भर पडतेय. होय, स्वातंत्र्यवीर सावरकर  अर्थात विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar’s biopic) यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येतोय. मराठमोळे पण हिंदी सिनेसृष्टीत दबदबा असलेले दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. अलीकडे वीर सावरकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता या सिनेमात कोणाची वर्णी लागणार? स्वातंत्र्यवीरांची भूमिका कोण साकारणार? याची चर्चा सुरू झालीये आणि काही नावांचीही जोरदार चर्चा आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ असे या शीर्षक असलेल्या या सिनेमासाठी बॉलिवूडच्या तीन अभिनेत्यांची नावं शर्यतीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर मुळातच पहाडाएवढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व. त्यांची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्यासाठी तितक्याच सशक्त अभिनेत्याची गरज आहे. तूर्तास यासाठी आयुष्यमान खुराणा (Ayushmann Khurrana), रणदीप हुड्डा (Randeep Hooda)व  राजकुमार राव (Rajkumar Rao) यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

आयुष्यमान असो की, राजकुमार किंवा रणदीप हे तिघेही चित्रपटासाठी अक्षरश:  ढोर मेहनत घेतात. भूमिकेसाठी शारिरीक बदल घडवण्यास तयार असतात. ‘सरबजीत’ या सिनेमासाठी रणदीपने अगदी 20 दिवसांत 18 किलो वजन कमी केले होते, हे तुम्ही जाणताच. त्यामुळे वीर सावरकर यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी या तिघांची नावं चर्चेत आहेत.  आयुष्यमान खुराणा याचे नाव या शर्यतीत सगळ्यांत पुढे असल्याचे कळतेय. अर्थात अद्याप कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चरित्रपटाचे शूटिंग हे लंडन, अंदमान आणि महाराष्ट्राच्या इतर भागात होणार आहे. दरम्यान सावरकर यांचे निवासस्थान दादर मध्ये आहे.  यापूर्वी महेश मांजरेकरांनी पु.ल. देशपांडे यांच्यावरील चरित्रपट दोन भागांमध्ये रसिकांसमोर आणला होता.

 

टॅग्स :महेश मांजरेकर आयुषमान खुराणाराजकुमार रावरणदीप हुडाविनायक दामोदर सावरकर