बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता आयुषमान खुराना सध्या चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकरी संतापले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये आयुषमान 'दिल-दिल पाकिस्तान' हे गाणं गाताना पाहायला मिळत आहे. यावरुन नेटकऱ्यांनी त्याला प्रंचड ट्रोल केलं आहे. ऐवढचं नव्हे तर सोशल मीडियावर #AyushmanKhuranaboycott ट्रेंडिंगला सुरुवात झाली आहे.
नुकतेचं आयुषमान अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला हजर राहिला होता. त्याचे काही फोटोही समोर आले होते. यानंतर आयुषमानचा 'दिल-दिल पाकिस्तान' हे गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर आयुषमानने हे गाणं गायले असल्याचा दावा करण्यात आला. तसेच आयुष्मानने हे गाणे पाकिस्तानमध्ये जाऊन गाणे गायले, असेही नेटकऱ्यांनी म्हटलं. तर या व्हिडीओमागील सत्य समोर आलं आहे.
रिपोर्टनुसार, आयुषमाननं पाकिस्तानातील नाही तर दुबईतील एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हे गाणे गायले होते. पाकिस्तानी गायक अली जफरनेसुद्धा या कॉन्सर्टमध्ये आयुष्मानबरोबर परफॉर्म केलं होतं. बांग्लादेश, श्रीलंका, भारत आणि पाकिस्तान या आशियायाई देशांना ट्रीब्युट आयुषमाननं दिला होता. याच कॉन्सर्टमध्ये त्यानं 'चक दे इंडिया' हे गाणेही गायले होते. पण, सोशल मीडियावर फक्त 'दिल दिल पाकिस्तान' ही क्लिप तुफान व्हायरल होत आहे. तसेच पाकिस्तानचे गुणगान करणाऱ्याला आयुषमानला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण का दिले, असाही सवाल करत युजर्स आगपाखड करत आहेत.