आयुषमान खुरानानं 'डॉक्टर जी'च्या सिनेमातील 'ओ स्वीटी स्वीटी' गाण्याला दिला स्वरसाज, टीझर आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 07:48 PM2022-09-27T19:48:52+5:302022-09-27T19:49:39+5:30
आयुषमान खुरानाने सर्वांनाच आश्चर्यचा सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्याने त्याच्या आगामी 'डॉक्टर जी' चित्रपटातील 'ओ स्वीटी स्वीटी' गाण्याची झलक रिलीज सादर केली असून, हे गाणे आयुषमानने स्वतः गायले आहे
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना(Ayushman Khurana)ने सर्वांनाच आश्चर्यचा सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्याने त्याच्या आगामी 'डॉक्टर जी' चित्रपटातील 'ओ स्वीटी स्वीटी' गाण्याची झलक रिलीज सादर केली असून, हे गाणे आयुषमानने स्वतः गायले आहे. हे गाणे तुमच्या मनाचा ठाव घेईल. या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टीझरला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
'ओ स्वीटी स्वीटी' ही अमित त्रिवेदीची हृदयस्पर्शी रचना आहे, ज्याचे बोल राज शेखर यांनी लिहिले आहेत. आयुषमानच्या आवाजाने जी जादू निर्माण केली असून, हे गाणे त्याच्या सौंदर्यात्मक आणि मिनिमलिस्टिक सेटअपसह एक व्हिज्युअल ट्रीट बनले आहे जे संगीतप्रेमींना थेट परफॉर्मन्सची अनुभूती देते. हे गाणे खरोखरच अभिनेत्याच्या हृदयाच्या जवळ असल्याने ते लवकरात लवकर प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. त्यामुळे टीम डॉक्टर जी आणि जंगली पिक्चर्सने या गाण्याचा स्निपेट रिलीज करून प्रेक्षकांसमोर या गाण्याची झलक सादर करण्याचा निर्णय घेतला.
सुमित सक्सेना, सौरभ भरत, विशाल वाघ आणि अनुभूती कश्यप यांनी लिहिलेला 'डॉक्टर जी' १४ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जंगली पिक्चर्सच्या आगामी स्लेटमध्ये 'वो लड़की है कहाँ?', 'डोसा किंग', 'उलज' आणि 'क्लिक शंकर' यांचा समावेश आहे.