Join us

७ वर्षांत दुसऱ्यांदा ब्रेस्ट कॅन्सर, तरीही हिंमत हरली नाही अभिनेत्याची पत्नी, म्हणाली- "आता बरी होतेय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:40 IST

पुन्हा ब्रेस्ट कॅन्सर, आता कशी आहे आयुषमान खुरानाची पत्नी, ताहिराने दिले हेल्थ अपडेट

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिला पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. काही दिवसांपूर्वीच ताहिराने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली. त्यानंतर सगळ्यांनीच तिच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. ताहिराच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांसोबत सेलिब्रिटींनीही तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. पण, या सगळ्यात अजूनही ताहिरा कश्यप हिंमत हारली नाही. ती मोठ्या धीराने आणि हिमतीने कॅन्सरशी लढा देत असून उपचार घेत आहे. 

ताहिराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करत हेल्थ अपडेट दिले आहेत. यामध्ये तिने बरी होत असल्याचं म्हटलं आहे. ताहिराने तिच्या एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिच्या हातात एक सूर्यफूल दिसत आहे. हा फोटो शेअर करत ती म्हणते, "तुमच्या प्रार्थना आणि प्रेम हे मॅजिकल आहे. धन्यवाद...मी घरी परतले असून आता बरी होत आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या तुमच्यापैकी काहींना मी ओळखते तर कित्येकांना मी ओळखतही नाही. तरीदेखील तुमच्या चांगल्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याचप्रमाणे तुमच्यापैकी काही जण मला ओळखतात तर काही नाही. पण, तुम्हा सगळ्यांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि नात्यांपलिकडे जाऊन जेव्हा असे कनेक्शन बनतात तेव्हा त्याला मानवता म्हणतात". 

ताहिराला २०१८ मध्ये पहिल्यांदा ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल समजतात ताहिरा आणि आयुषमानच्या पायाखालची जमीनच सरकली होती. मात्र यावर उपचार घेत २०२० मध्ये ती पूर्णपणे बरी झाली होती. आता ७ वर्षांनी पुन्हा कॅन्सरने डोकं वर काढलं आहे. 

टॅग्स :आयुषमान खुराणासेलिब्रिटीकर्करोग