Join us

आयुष्मान खुरानाचा 19 वर्षांपुर्वीचा ऑडिशन व्हिडीओ पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 18:37 IST

आयुष्मान खुराना हा व्हिडीओत एमटीव्ही रोडीजच्या दुसऱ्या सीझनसाठी ऑडिशन देताना दिसतोय.

आयुष्मान खुराना हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आज 14 सप्टेंबर 2023 रोजी तो आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'विकी डोनर', 'बरेली की बर्फी', 'बधाई हो', 'आर्टिकल 15' यांसारख्या शानदार चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आयुष्मान खुरानाचा बॉलिवूडपर्यंत पोहचण्याचा प्रवास फार खडतर राहिला आहे.

 सध्या आयुष्मानचा एक व्हिडीओ समोर आलायं. यामध्ये तो एमटीव्ही रोडीजच्या दुसऱ्या सीझनसाठी ऑडिशन देताना दिसतोय. यात तो 'MTV रोडीज सीझन 2' चे जज रघु रामसमोर स्वतःची ओळख करून देताना पाहायला मिळतोय. 

 व्हिडीओमध्ये आयुष्मान म्हणतो, 'हाय, माझे नाव आयुष्मान खुराना. मी  चंदीगडमधून मास कम्युनिकेशन करतोय. मित्र बनवणे ही माझी खासियतच नाही तर तो माझा व्यवसायही आहे. या ऑडिशननंतर आयुष्मानचे सिलेक्शन झाले होते आणि रोडीजच्या सिझन 2 विनर ठरला होता. 

आयुष्मानने आयुष्मान खुरानाने केवळ टेलिव्हिजन शो होस्ट केले होते.  शिवाय, 'कयामत' आणि 'एक थी राजकुमारी' सारख्या मालिकांमध्ये काम केले.  दीर्घ संघर्षानंतर आयुष्मानला 2012 मध्ये 'विकी डोनर' हा पहिला चित्रपट मिळाला आणि या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड चित्रपटांच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करण्यास सुरुवात केली. तेथून त्याने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. 

आयुष्मान खुरानाने आपल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आयुष्मानने 'अंधाधून','बरेली की बर्फी','आर्टिकल 15' या सिनेमांमधूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली. नुकताच त्याचा 'ड्रीम गर्ल 2' रिलीज झाला असून त्याच्या भूमिकेचं कौतुक होतंय.

टॅग्स :आयुषमान खुराणाबॉलिवूडएमटीव्ही