Join us

‘अझहर’चे यश सरासरी, शुक्रवारी येतोय ‘सरबजीत’

By admin | Published: May 17, 2016 1:38 AM

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान मोहम्मद अझरुद्दीन याच्या जीवनावर बनविलेल्या ‘अझहर’ने बॉक्स आॅफिसच्या खेळपट्टीवर फारच मंदगती फलंदाजी केली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान मोहम्मद अझरुद्दीन याच्या जीवनावर बनविलेल्या ‘अझहर’ने बॉक्स आॅफिसच्या खेळपट्टीवर फारच मंदगती फलंदाजी केली आहे. पहिल्या तीन दिवसांतील त्याचा गल्ला २१ कोटींच्या जवळपासचा होता. हा आकडा सरासरी यशाचा मानला जातो. पहिल्या दिवशी ‘अझहर’ची कमाई ६ कोटी, शनिवारी ७ कोटी आणि रविवारी ती ८ कोटींच्या जवळपास होती. चित्रपट बघणाऱ्यांची आणि प्रसार माध्यमांतील प्रतिक्रिया संमिश्र होती. दुबळी पटकथा हाच ‘अझहर’च्या यशातील अडथळा मानला जातो. त्यासोबत प्रदर्शित झालेला अरविंद स्वामीचा चित्रपट ‘डिअर डॅड’लादेखील काही प्रभाव पाडता आलेला नाही. वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यावर बनविलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी स्वीकारले नाही. विवेक अग्निहोत्रीचा वादात अडकलेला चित्रपट ‘बुद्धा इन ए ट्रफिक जॅम’लाही बॉक्स आॅफिसवर टिकला नाही.मागे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल सांगायचे, तर विक्रम भट्ट यांचा हॉरर सस्पेन्स चित्रपट ‘१९२० लंडन’चा गल्ला १२ कोटींपर्यंत गेला. हा गल्ला त्याच्यासोबत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या तुलनेत खूप चांगला मानला जातो. मनोज वाजपेयीचा ‘ट्रॅफिक’ आणि सनी लिओनचा ‘वन नाइट स्टँड’ची फारच फरपट झाली व हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले.