‘बाहुबली’ फेम देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी ही एका अपघातातून थोडक्यात बचावली. अनुष्का लवकरच सुरपस्टार चिरंजीवीसोबत ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ या सिनेमात झळकणार आहेत. सध्या या सिनेमाचे शूटींग सुरु आहे. याच शूटींगदरम्यान अनुष्काचा अपघात झाला आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का चित्रपटाचा एक सीन शूट करत होती. याचदरम्यान तिला अपघात झाला आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. या अपघाताचा गवगवा होऊ नये म्हणून ती गुपचूप डॉक्टरांकडे गेली. तूर्तास डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
हा चित्रपट स्वातंत्र्य सेनानी यू नरसिम्हा रेड्डी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी बिग बींनी या चित्रपटाबद्दल आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते. मी इतिहासातील सर्वाधिक शूर व्यक्तिरेखा साकारणार आहे, असे त्यांनी लिहिले होते. ‘सैरा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम अशा चार भाषांत प्रदर्शित होणार आहे.