सिनेइंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभाशाली दिवंगत अभिनेता इमरान खानचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) सध्या चर्चेत आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बाबिलही सिनेइंडस्ट्रीत आला आहे. त्याने आपल्या साधेपणाने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय. नुकतंच बाबिलने एक पोस्ट केली आहे ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष गेलं. त्याने आपल्या गर्लफ्रेंडसोबतचे फोटो पोस्ट करत ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं. पहिल्यांदाच एखाद्या कलाकाराने अशा प्रकारे उघडपणे ब्रेकअप झाल्याची माहिती दिली असेल.
बाबिल खानने एका मिस्ट्री गर्लसोबत फोटो पोस्ट केलेत. यामध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. बाबिलने यासोबत अतिशय भावनिक कॅप्शन लिहिले आहे. तो लिहितो," मला नाही वाटत मूव्ह ऑन म्हणजे तुम्ही ज्याच्यावर प्रेम करत होता त्याला विसरणं. वास्तविक पाहता तुम्ही कधीच अशा व्यक्तीपासून मूव्ह ऑन करु शकत नाही. ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचा भाग असते. तुम्हाला घडवण्यात तिचा हात असतो. पायऱ्यांवरुन उतरताना माझा दात तुटला, हसताना मला तुझा आवाज खूप आवडतो. तू जाशील तेव्हा माझं हास्यही घेऊन जा. मला तुला पाहत बसायला आवडतं. तुझा श्वासाची मला आठवण येईल, तुझं सतत हसणं आणि बीचवर स्कुबा गिअर घेऊन जाणं. मला तुझा हात पकडायला आवडतं. पळत पळत रस्ता क्रॉस करणं, घरापासून दूर वेळ घालवणं. नंतर तुला पावसात घरी सोडणं आणि तू मुद्दामून छोटी छत्री सोबत ठेवणं. तुला अजिबात न आवडणारा तुझा टॅटू हे सगळं मला आठवेल. तुझी आठवण काढणं मला आवडतं."
बाबिलने याआधीही एक पोस्ट केली होती. प्रकृती पावनीसोबत त्याने फोटो पोस्ट केले होते. यासोबत त्यावने लिहिले होते की,'बऱ्याचदा मला असं वाटतं की मी सगळं सोडून बाबाच्या जवळ जातोय. तुझं नसणं आता माझ्यासाठी आणखी कठीण होत चाललंय.'
बाबिलची गर्लफ्रेंड प्रकृती पावनी दिल्लीची आहे आणि मुंबईत काम करत आहे. ती मॉडेल आणि सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिने शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलंय.