Join us

KBC 11 : खिचडी बनवणाऱ्या महिलेचं बुद्धीमत्तेच्या बळावर पालटलं नशीब, बनली करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 6:35 PM

Kaun Banega Crorepati 11 : बबीता ताडे अंजनगाव सूर्जीच्या शाळेत शालेय पोषण आहाराची खिचडी बनवण्याचं काम करतात.

कौन बनेगा करोडपतीच्या अकराव्या सीझनचा दुसरा करोडपती मिळाला आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या ट्विटरवर विजेत्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्या विजयाचा खुलासा केला आहे. ही विजेती आहे अमरावतीतील बबीता ताडे. बबीता ताडे अंजनगाव सूर्जीच्या शाळेत शालेय पोषण आहाराची खिचडी बनवण्याचं काम करतात. 

बबीता ताडे यांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर थेट मुंबई गाठत 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये सहभागी झाल्या. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत एक कोटी रुपये जिंकून त्या करोडपती झाल्या आहेत. 

कौन बनेगा करोडपती शोच्या प्रोमोमध्ये बबीता यांनी सांगितलं की, ४५० मुलांसाठी खिचडी बनवल्याच्या मोबदल्यात १५०० रुपये वेतन मिळतं. मात्र याबद्दल त्यांना कुठेही दुःख वाटत नाही. कारण मुलांसाठी खिचडी बनवायला त्यांना खूप आवडतं.

इतकंच नाही तर शोदरम्यान अमिताभ बच्चन यांनी बबीता यांची इच्छादेखील पूर्ण केली. यासाठी त्या केबीसीच्या हॉट सीटपर्यंत पोहचण्यासाठी यशस्वी ठरल्या. खरंतर बबीता यांच्या कुटुंबात फक्त एकच फोन होता. बबीता यांच्याकडे फोन नव्हता. मात्र केबीसी शो दरम्यान अमिताभ बच्चन यांनी बबीता यांना एक फोनही गिफ्ट केला.

 बबिता ताडे यांचा हा भाग १८ आणि १९ सप्टेंबरला प्रसारित होणार आहे.

 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनअमरावती