अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या 'बेबी जॉन' सिनेमामुळे चर्चेत आहे. दोन वर्षांनी त्याचा हा सिनेमा रिलीज झाला आहे. 'जवान' फेम साऊथ दिग्दर्शक ॲटलीने सिनेमाची निर्मिती केली आहे. वरुणचे जबरदस्त ॲक्शन सीन्स आणि एकंदर मसाला मूव्ही आहे. या सिनेमात वरुणने दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशसोबत रोमान्स केला आहे. वरुणची त्याच्या कोस्टार्ससोबतची केमिस्ट्री पाहून पत्नी नताशाला काय वाटतं याचा खुलासा त्याने नुकताच केला.
'बेबी जॉन' निमित्त वरुण धवनने अनेक मुलाखती दिल्या. तुला इ्तर अभिनेत्रींसोबत पाहून नताशा इनसिक्योर होते का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर वरुण म्हणाला, "नताशा मला चांगलं ओळखते. तिला माहित आहे हा परत घरीच येणार आहे. मी असाच आहे. मला फार काही हौस नाही. मी लोकांशी चांगलं बोलतो, मस्ती करतो इतकंच. यापेक्षा जास्त कोणत्याच गोष्टीत मला रस नसतो. नताशाला कधीच माझ्यामुळे किंवा माझ्या प्रोफेशनमुळे इनसिक्योर वाटलं नाही."
तो पुढे म्हणाला, "लग्नानंतर तुम्ही दुसऱ्या कोणाकडे बघतच नाही असं खोटं तुम्ही बोलूच शकत नाही. मी नताशासोबत सगळं शेअर करतो. तिला सगळं सांगतो. मी तिला सांगतो अरे ती मुलगी खूप सुंदर आहे तुला काय वाटतं? एवढं तर तुम्ही तुमच्या पत्नीसोबतच बोललंच पाहिजे. हॅपी मॅरेज काय असतं याचा माझ्याकडे कोणता फॉर्म्युला नाही. पण माझं नताशावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम आहे. ती माझ्यापेक्षाही चांगली व्यक्ती आहे."
नताशा दलालचा फिल्मी कुटुंबाशी काहीच संबंध नाही. ती फॅशन डिझायनर आहे. शाळेत असल्यापासूनच वरुणला नताशा आवडते. वयाच्या २० वर्षांपासून ते रिलेशिनशिपमध्ये होते.