Join us

Baby John Teaser: वरुण धवनचा रावडी अंदाज अन् जॅकी श्रॉफ यांचा खलनायक! 'बेबी जॉन'चा हटके टीझर बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 13:11 IST

वरुण धवनच्या बहुचर्चित 'बेबी जॉन'चा टीझर रिलीज झाला असून शाहरुखच्या जवान सिनेमाचा दिग्दर्शक अॅटली या सिनेमाचा निर्माता आहे (baby john, varun dhawan)

वरुण धवनने आजवर बॉलिवूडमध्ये विविध भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'स्टूडंट ऑफ द इयर' सिनेमातून वरुणने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  पुढे 'बदलापूर', 'जुग जुग जियो', 'भेडीया', 'मै तेरा हिरो' अशा सिनेमांमधून वरुण कधी आपल्याला रोमँटिक तर कधी थ्रिलर भूमिकेत दिसला. वरुण धवनच्या चाहत्यांना आता सुखद धक्का मिळणार आहे. कारण वरुणचा आगामी 'बेबी जॉन' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. यात वरुण कधीही न पाहिलेल्या रावडी अंदाजात दिसतोय.

बेबी जॉनचा टीझर

'बेबी जॉन'चा टीझरमध्ये सुरुवातीला गुंडांमध्ये मारामारी दिसते. पुढे बॅकग्राऊंडला एका मुलीचा आवाज येतो की, "मुंगी एकटी असेल तर तिला मारणं सोप्पं आहे. पण अनेक मुंग्या एकत्र आल्या तर त्या हत्तीलाही हरवू शकतात." पुढे पोलिसाच्या गणवेशात वरुण धवनची डॅशिंग एन्ट्री दिसते. नंतर हातात टेडी बियर घेऊन वरुण गुंडांशी दोन हात करायला सज्ज असतो. याशिवाय या टीझरमध्ये जॅकी श्रॉफची खलनायक म्हणून एन्ट्री झालेली दिसते. हातात कुऱ्हाड घेऊन जमीन खोदताना दिसतात. 

'मेरे जैसे बहुत आए होंगे, लेकिन मैं पहली बार आया हूं...।' या डायलॉगने टीझरचा शेवट होतो. अशाप्रकारे आजवर वरुण धवनचा कधीही न पाहिलेला रॉकिंग अंदाज टीझरमध्ये पाहायला मिळतो. २५ डिसेंबर २०२४ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. शाहरुखच्या 'जवान' सिनेमाचा दिग्दर्शक अॅटली या सिनेमाचा प्रेझेंटर आहे. अशाप्रकारे 'बेबी जॉन'चा टीझर एकदम हटके असून अल्पावधीत लोकांनी या टीझरला पसंती दिलीय.

टॅग्स :वरूण धवनबॉलिवूडजॅकी श्रॉफ