सेलिब्रिटी त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. आपल्या चाहत्यांबरोबर ते त्यांची फिटनेस जर्नीही शेअर करतात. कधी भूमिकेची गरज म्हणून तर कधी फिट राहायचं म्हणून सेलिब्रिटी वजन घटवतात. सेलिब्रिटींचं ट्रान्सफॉर्मेशन बघून अनेकदा चाहतेही थक्क होतात. यासाठी सेलिब्रिटींना डाएट फॉलो करण्याबरोबरच व्यायामाची प्रचंड मेहनत घ्यावी लागते. अभिनेता राम कपूरनेही तब्बल ४२ किलो वजन घटवलं आहे.
'बडे अच्छे लगते है' फेम राम कपूरचं ५१ व्या वर्षी थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. राम कपूरने काही दिवस सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. या काळात तो स्वत:वर काम करत होता. त्यानंतर आता पत्नीबरोबरचा फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. फोटो पोस्ट करत त्याने ४२ किलो वजन घटवल्याचं सांगितलं आहे. या फोटोमध्ये त्याला ओळखणंही कठीण झालं आहे.
राम कपूरने त्याचा एक मिरर सेल्फी शेअर केला आहे. "हॅलो, गेले काही दिवस मी सोशल मीडियावर सक्रिय नव्हतो, त्याबद्दल माफी मागतो. पण, मी स्वत:वर काम करत होतो", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याने त्याच्या पत्नीबरोबरचा फोटोही शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने ४२ किलो वजन घटवल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. राम कपूरच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, राम कपूरने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'बडे अच्छे लगते है' ही त्याची सर्वात गाजलेली मालिका. 'कुछ कुछ लोचा है', 'हमशकल', 'करले तू भी मोहोब्बत', 'स्टुडंट ऑफ द इयर', 'मेरे डॅड की मारुती' या सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. अलिकडेच त्याचा 'योध्रा' हा सिनेमा प्रदर्शित झाला.