‘अनुपमा’ ही प्रेक्षकांची आवडती हिंदी मालिका. याशिवाय ‘बडे अच्छे लगते है 2’ (Bade Achhe Lagte Hain 2) ही मालिका सुद्धा प्रेक्षकवर्गात तितकीच लोकप्रिय आहे. तुम्हीही ‘बडे अच्छे लगते है 2’चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, ‘बडे अच्छे लगते है 2’ ही मालिका लवकरच बंद होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. नकुल मेहता (Nakuul Mehta) व दिशा परमार ( Disha Parmar) यांची लीड भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. पण मग ती बंद का होतेय? यामागे वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत.
रिपोर्टनुसार, कमी टीआरपीमुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. येत्या तीन महिन्यांत ही मालिका गुंडाळण्याचा मेकर्सचा प्लान आहे.
टीआरपी की आणखी वेगळं कारण?
‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका प्रचंड गाजली होती. यानंतर याचा दुसरा सीझन ‘बडे अच्छे लगते है 2’ आणला गेला. अलीकडे या मालिकेत राम आणि प्रियाच्या कहाणीत पाच वर्षाचा लीप दाखवला जात आहे. यात राम व प्रिया वेगळे झाल्याचं दाखवलं गेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून यामुळे चाहते निराश आहेत. राम व प्रियाला वेगळं होतांना पाहणं चाहत्यांना आवडलेलं नाही. शिवाय अलीकडे मालिकेचा वेग प्रचंड मंदावला आहे. मालिका सुस्त वाटू लागलीये. यामुळेही चाहते निराश आहेत. ‘बडे अच्छे लगते है 2’च्या सेट आणि लाइटींगबद्दलही लोकांची नाराजी आहे. यामुळे मालिकेचा टीआरपी घसरला आहे. चर्चा खरी मानाल तर एकता कपूरने मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. टीआरपी वाढला नाही तर येत्या 3 महिन्यांत ही मालिका गुंडाळण्याचा इशाराही तिने दिला आहे.
पहिला सीझन प्रचंड गाजला, दुसरा सीझनही लोकांना आवडला..2011 मध्ये ‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका सुरू झाली होती. यात राम कपूर व सांक्षी तंवर मुख्य भूमिकेत होते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. 2014 मध्ये या मालिकेने निरोप घेतला होता. यानंतर गतवर्षी ऑगस्ट महिन्यात ‘बडे अच्छे लगते है 2’ हा दुसरा सीझन सुरू झाला. या दुसऱ्या सीझनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. लोकांना मालिका आवडली होती. पण आता अचानक मालिका बंद होणार म्हटल्यावर चाहते निराश झाले आहेत.