Join us  

‘बॅडमॅन हीच माझी ओळख!’

By admin | Published: June 24, 2017 1:25 AM

गुलशन ग्रोव्हरची ओळख आज ‘बॅडमॅन’ म्हणूनच आहे. त्याच्या या बॅडमॅन इमेजवर आधारित ‘बॅडमॅन’ ही वेबसिरीज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

गुलशन ग्रोव्हरची ओळख आज ‘बॅडमॅन’ म्हणूनच आहे. त्याच्या या बॅडमॅन इमेजवर आधारित ‘बॅडमॅन’ ही वेबसिरीज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ही वेबसिरीज सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे. ही वेबसिरीज आंतराष्ट्रीय स्तरावरील अनेक फेस्टिव्हलमध्ये दाखवली जात आहे. त्याच्या या वेबसिरीजविषयी आणि त्याच्या बॅडमॅन या इमेजविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...आज बॅडमॅन अशीच तुझी ओळख बनली आहे. तुला बॅडमॅन अशी कोणी हाक मारली, तर त्यावर तुझी प्रतिक्रिया काय असते?- खरे तर कोणालाही बॅडमॅन अशी हाक मारलेली आवडणार नाही; पण मला स्वत:ला कोणी बॅडमॅन असे म्हटले तर ते खूप आवडते. कारण आज अनेक वर्षे मी खलनायक म्हणून काम करत आहे. माझ्या सगळ्या खलनायकी भूमिकांमुळे मला आज प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे मला कोणी बॅडमॅन म्हटले, तर ते माझ्या कामाचे कौतुक करत आहे, असे मला वाटते. त्यामुळे मला कोणी बॅडमॅन म्हटले, तर आनंदच होतो.बॅडमॅन ही वेबसिरीज प्रेक्षकांना इतकी आवडेल, असे तुला वाटले होते का?- खरे सांगू, तर मला ज्या वेळी बॅडमॅन या वेबसिरीजविषयी सांगण्यात आले, त्या वेळी ती कोणी पाहील का, असा पहिला प्रश्न पडला होता. या वेबसिरीजमध्ये मी कोणतीही व्यक्तिरेखा साकारत नसून गुलशन ग्रोव्हर म्हणूनच प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. केवळ या वेबसिरीजची कथा ही काल्पनिक आहे. यात माझी टरदेखील उडवली आहे. त्यामुळे ही वेबसिरीज स्वीकारल्यानंतरदेखील मी तिचा भाग होऊ नये, असे मला अनेक वेळा वाटले होते; पण तिच्या निर्मात्यांनी माझा हा विचार बदलला. आज या वेबसिरीजला मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत मी खूपच खूष आहे. ‘बॅडमॅन’ चित्रपटात खलनायक हाच नायक आहे. तुला स्वत:ला वेबसिरीज या माध्यमाविषयी काय वाटते?- वेबसिरीज हे एंटरटेन्मेंटचे पुढचे भविष्य आहे, असेच मी म्हणेन. सध्या अनेक वेबसिरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण, प्रेक्षकांना कोणत्या प्रकारच्या वेबसिरीज आवडतात, हे सांगणे आजही खूपच कठीण आहे. कारण आज अनेक वेबसिरीजमध्ये शिव्या देणारी मंडळी दाखवली जातात. तसेच अतिशय अ‍ॅडल्ट कंटेट पाहायला मिळतंय. त्यामुळे या वेबसिरीज आपल्या कुटुंबीयांसोबत पाहणे अशक्य आहे. पण, त्यातही बॅडमॅनसारख्या अतिशय चांगल्या आणि कुटुंबीयांसोबत पाहता येणाऱ्या वेबसिरीज बनवल्या जात आहेत. लोकांना वेबसिरीजमध्ये काय पाहायला मिळते, हे काही काळात आपल्याला नक्की कळेल, असे वाटते. तू अनेक वर्षे चित्रपटांमध्ये काम केले आहेस; वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?- मी वेबसिरीजमध्ये काम केले, असे मला कधी वाटलेच नाही. कारण एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण जशा प्रकारे केले जाते, त्याचप्रमाणे आम्ही वेबसिरीजचे चित्रीकरण केले होते; पण भविष्यातदेखील मला वेबसिरीजमध्ये काम करायला नक्कीच आवडेल.