Join us

Prabhas: क्रिती सनॉनला डेट करत असल्याच्या चर्चेवर अखेर प्रभासने सोडले मौन, म्हणाला- मॅडमनी आधीच..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 4:27 PM

राम चरणनं प्रभास लवकरच एक चांगली बातमी देणार असल्याचं सांगितलं आहे.

साऊथचा स्टार प्रभास सध्या त्याच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. अभिनेत्याच्या पर्सनल आयुष्याबाबत नवीन बातम्या समोर येत आहेत. तो 'आदिपुरुष'ची को-स्टार क्रिती सनॉनला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. प्रभास आणि क्रितीच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहेत. 'बाहुबली' फेम अभिनेत्याने क्रितीसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच मौन सोडले आहे.

अलीकडेच प्रभास नंदामुरी बालकृष्णा(Nandamuri Balakrishna) च्या टॉक शो अनस्टॉपेबल(Unstoppable)मध्ये गेस्ट म्हणून आला होता. या कार्यक्रमा दरम्यान प्रभासनं  राम चरणला कॉल केला होता आणि त्यादरम्यान तो गंमतीत म्हणाला की प्रभास लवकरच एक चांगली बातमी देणार आहे. नंदामुरी बालकृष्ण प्रभासला विचारतात की, तू अनेक स्टार्ससोबत काम केलेस, मग राम फक्त सीतेच्या प्रेमात पडला असे कसे झाले? संदर्भ क्रिती सनॉनचा होता, ज्यावर प्रभास म्हणाला, 'सर, ही जुनी बातमी आहे. यावर मॅडम यांनी आधीच उत्तर दिले आहे.

 'भेडिया'च्या प्रमोशनदरम्यान वरुण धवनने क्रिती आणि प्रभासच्या डेटींगच्या बातम्यांना मजेत इशारा दिला होता, त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना उधाण आलं होतं. यानंतर क्रिती सेननने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या बातम्यांचे खंडन केले. या बातम्यांमध्ये  काहीही तथ्य नसून ही केवळ अफवा असल्याचे अभिनेत्रीने म्हटले होते.

 प्रभास आणि क्रिती सनॉन 'आदिपुरुष'मध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका आणि विरोध झाला होता. या विरोधामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवण्यात आली. त्याच वेळी, आता हा चित्रपट जून 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खानही दिसणार आहे.

टॅग्स :प्रभासक्रिती सनॉन