Join us

बाजीराव आला रे...!, ऋषी सक्सेना दिसणार हिंदी मालिकेत, पोलिसाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 16:16 IST

Rishi Saxena : ऋषी सक्सेना लवकरच हिंदी टेलिव्हिजनवरील एका लोकप्रिय मालिकेत दिसणार आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काहे दिया परदेस मालिकेतून अभिनेता ऋषी सक्सेना(Rishi Saxena)ने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेत त्याने शिवची भूमिका साकारली होती. या मालिकेतील त्याची आणि सायली संजीवची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. या मालिकेनंतर ऋषीने आणखी काही मराठी मालिका आणि सिनेमात काम केले. दरम्यान ऋषी सक्सेना लवकरच एका हिंदी मालिकेत दिसणार आहे. याबद्दल खुद्द त्यानेच सोशल मीडियावर सांगितले आहे. 

ऋषी सक्सेना याने सोशल मीडियावर मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तो पोलिसाच्या अवतारात दिसत आहे. त्याने हे फोटो शेअर करत लिहिले की, बाजीराव आला रे...लय भारी!! तो गुम है किसी के प्यार में या मालिकेत दिसणार आहे. तो या मालिकेत बाजीराव राणे ही मराठमोळ्या पोलिसाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

चाहत्यांसह सेलिब्रेटींच्या प्रतिक्रियाऋषी सक्सेनाच्या या पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्याच्या या पोस्टवर त्याची गर्लफ्रेंड इशा केसकरने कमेंट केली आहे. तिने लिहिले की, मुँछे हो तो बाजीराव जैसी. बालकलाकार श्री पोकळेने लिहिले की, सिंघम. एका चाहत्याने लिहिले की, सर तुम्ही खूप छान अभिनय करता. गुड जॉब बाजीराव राणे सर. अभिनेता अभिजीत श्वेतचंद्राने लिहिले की, एएएए आया पोलिस. 

वर्कफ्रंटबद्दल...ऋषी सक्सेनाने काहे दिया परदेस या मालिकेनंतर बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. तो सुभेदार, शेर शिवराज आणि पावनखिंड या चित्रपटात झळकला आहे. यापूर्वी देखील त्याने हिंदी मालिकेत काम केले आहे. या मालिकेचं नाव होतं सावी की सवारी. याशिवाय तो लवकरच छुमंतर या मराठी चित्रपटात दिसणार आहे.  

टॅग्स :ऋषी सक्सेना