Join us

बाजीराव मस्तानीचं 'पद्मावती'मुळे ब्रेकअप?

By admin | Published: March 29, 2017 12:05 PM

बॉलिवूडमधील बाजीराव-मस्तानी म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या ब्रेकअपची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - बॉलिवूडमधील बाजीराव-मस्तानी म्हणजे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या ब्रेकअपची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. त्यांच्या ब्रेकअपचं गॉसिप सुरू असतानाच दोघांचा एकत्र असलेला फोटो सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. गेल्या बराच काळ हे दोघं एकत्र दिसले नव्हते. मात्र या फोटोमध्ये दोघंही एका एअरपोर्ट शटमध्ये शेजारी-शेजारी बसल्याचं पाहायला मिळत आहे. 
 
या फोटोमध्ये दीपिका शांत, तर दुसरीकडे मज्जा-मस्तीच्या मूडमध्ये असणार रणवीरही थोडासा चिंतेत वाटत आहे. त्यांच्या अशा वर्तनाचं कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. एका पुरस्कार सोहळ्यात बाजीरावशिवाय म्हणजे रणवीरशिवाय दीपिकाने एकटीनेच हजेरी लावली. तेव्हापासूनच रणवीर-दीपिकाचं ब्रेकअप झाल्याची अफवा पसरली. अद्यापपर्यंत दोघांनीही आपलं नातं जाहीररित्या स्वीकारलं नसलं, तरीही प्रेक्षक, चाहते आणि कॅमे-यासमोर दोघांनाही एकत्रित बिंदासपणे सामोरं जाताना सर्वांनी पाहिलं आहे. 
 
नुकतंच दीपिकाचा हॉलिवूड सिनेमा 'xXx: रिटर्न ऑफ जेंडर केज' इंडियन प्रीमियरदरम्यान रणवीर आणि दीपिका हातात हात टाकून एकत्र दिसले होते. मात्र यानंतर  दोघंही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणं टाळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, याचं कारणं दोघांचाही आगामी सिनेमा 'पद्मावती' असल्याचे बोललं जात आहे. कारण दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दोघांनी सिनेमाच्या प्रमोशनपूर्वी सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसू नये, असं बजावलं आहे.  कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी भन्साळी काळजी घेतल असल्याची माहिती आहे.
 
दरम्यान, संजय लीला भन्साळी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'पद्मावती' 17 नोव्हेंबर 2017 रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच विविध कारणांमुळे बराच चर्चेत आहे.