Join us

पाहा गेल्या चार वर्षात इतकी बदलली 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी, समोर आले तिचे नवीन फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 14:52 IST

आता ही छोटीशी हर्षाली 11 वर्षाची झालीय. या चार वर्षात हर्षालीही खूप बदलीय.

'बजरंगी भाईजान' सिनेमा आठवताच सर्वात आधी आठवते ती म्हणजे मुन्नी  अर्थात हर्षाली मल्होत्रा. हर्षालीने या सिनेमात काम केले तेव्हा ती फक्त 7 वर्षाची होती. तसा तर हर्षालीसाठी बालकलाकार म्हणून हा पहिलाच सिनेमा होता. पण ज्या खुबीने छोट्याशा हर्षालीने मुन्नी ही भूमिका केली होती त्याची तोडच नव्हती. वेगवेगळ्या स्तरांवरून हर्षालीच्या कामाचे विशेष कौतुक केले गेले.

आता ही छोटीशी हर्षाली 11 वर्षाची झालीय. या चार वर्षात हर्षालीही खूप बदलीय. हर्षालीचे सध्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोत हर्षालीमध्ये कमालीचा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वीसारखीच हर्षाली अधिक क्युट दिसत आहे. हर्षालीचा  क्युट अंदाज पाहून तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सिनेमात मुन्नीच्या वाट्याला जास्त डायलॉग्स नव्हते. मात्र आपल्या विशेष शैलीने हर्षालीने रसिकांची मनं जिंकली होती. खरे तर सिनेमाचा स्टार हा सलमान खान होता. मात्र मुन्नीच्या पुढे यावेळी सलमानची जादू फिकी झाली होती. प्रत्येक जण त्यावेळी फक्त मुन्नीला भेटण्यासाठी आतुर असायचा. एका सिनेमामुळे हर्षाली जणू एक स्टार कलाकार बनली होती.

'बजरंगी भाईजान'सिनेमानंतर मुन्नीने कोणत्याही सिनेमात काम केले नाही. सध्या ती आपल्या शिक्षणावर आपले लक्ष केंद्रीत करत आहे. मात्र आता नवीन आलेल्या फोटोवरून पुन्हा एकदा मुन्नी रूपेरी पडद्यावर कधी झळकणार याचीच तिच्या चाहत्यांना उत्सुकता असणार हे मात्र नक्की.

हर्षाली नवीन फोटोमध्ये खूप स्टायलिश लूकमध्ये पाहायला मिळतेय. तिचा आवडता हिरो हा सलमान खान असून आवडती हिरोईन कॅटरिना कैफ आहे. सध्या हर्षाली सिनेमांपासून लांब असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. 

टॅग्स :सलमान खानहर्षाली मल्होत्रा