Join us  

बजरंगी भाईजानच्या अभिनेत्रीला दोन वर्षाचा कारावास

By admin | Published: July 10, 2017 12:05 PM

टेलिव्हिजन अभिनेत्री अलका कौशल यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 10- टेलिव्हिजन अभिनेत्री अलका कौशल यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संगरुर (पंजाब) कोर्टाने त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अलका कौशल यांनी बजरंगी भाईजान या सिनेमात अभिनेत्री करीना कपूर हिच्या आईची भूमिका साकारली होती तसंच क्वीन या सिनेमात त्यांनी कंगणा राणावतच्या आईची भूमिका साकारली होती. तसंच टेलिव्हिजनवरील ‘स्वरागिनी’ आणि ‘कुबूल है’ या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. 
 
अलका आणि त्यांच्या आईने अवतार सिंग नावाच्या एका शेतकऱ्याकडून ५० लाख रुपये घेतले होते. मालिकेच्या निर्मितीचं कारण देत हे पैसे त्यांनी घेतले होते. पण ते पैसे त्यांनी परत केलेच नाहीत. ज्यावेळी अवतार सिंग यांनी त्यांचे पैसे परत मागितले, तेव्हा त्यांना २५- २५ लाखांचे दोन चेक अवतार सिंग यांना दिले. पण, त्यांना देण्यात आलेले हे दोन्ही चेक बाऊंस झाले. अवतार सिंग यांचे वकील अॅडव्होकेट सुखबिर सिंग पुनिआ यांनी ही माहिती दिली आहे. 
आणखी वाचा
 

एअरपोर्ट भ्रष्टाचार प्रकरणी "चक दे" फेम नेगी होणार निलंबित?

...नाहीतर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू, चीनचा भारताला इशारा

"शहिदांचा अपमान करणा-या नालायकांचे तुकडे केले पाहिजेत"

50 लाख रूपयांचे दोन चेक बाऊंस झाल्यानंतर अवतार सिंग यांनी अलका आणि त्यांच्या आईविरोधात मलेरकोटला येथे गुन्हा दाखल केला. २०१५ मध्ये अलका आणि त्यांच्या आईला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, त्यांनी या निर्णयाविरोधात संगरुर कोर्टात याचिका दाखल केली. "आम्ही अवतारकडून पैसे घेतले नसल्याचं अल्का आणि त्यांच्या आईनं, संगरूर कोर्टात केलेल्या अपीलमध्ये म्हंटलं आहे.पण, याप्रकरणाचा संपूर्ण तपास झाल्यानंतर अलका आणि त्यांच्या आईला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून, दिलेल्या शिक्षेचा आदेश कायम ठेवला आहे. पोलीस तपास तसंच मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे कोर्टाने अलका आणि त्यांच्या आईला दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अलका आणि त्यांच्या आईची रवानगी संगरूर तुरूंगात करण्यात आली आहे. 

 
अभिनेत्री अलका कौशल यांनी बॉलिवूड सिनेमांबरोबरच मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. तसंच टेलिव्हिजनवरील अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख व्यक्तिरेखा साकारली आहे.