श्रेयस तळपदे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. श्रेयसला आपण आजवर हिंदी, मराठी सिनेमे गाजवताना पाहिले आहेत. श्रेयसने इक्बाल सारखे सिनेमे करुन प्रेक्षकांना रडवलं तर गोलमाल सारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. श्रेयसचा नुकताच 'कर्तम् भुगतम्' हा सिनेमा रिलीज झाला. त्यानिमित्ताने श्रेयसने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंबद्दल खास प्रतिक्रिया दिली
श्रेयस तळपदेबाळासाहेब ठाकरेंबद्दल काय म्हणाला?
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत श्रेयसला सध्याच्या काळातले कोणते राजकीय व्यक्ती आवडतात असं विचारण्यात आलं . त्यावेळी श्रेयसने बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं. श्रेयस म्हणाला, "माननीय बाळासाहेब ठाकरे हे मला प्रभावी नेते वाटतात. त्यांचा जनसंपर्क मोठा होता. त्यांच्या सभांना गर्दी व्हायची. शिवाजी पार्कवर लाखो लोकं त्यांच्या सभांसाठी जमायचे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे मला आदर्श नेते वाटतात."
जनतेचा कौल नरेंद्र मोदींकडे
श्रेयस तळपदेने पुढे सध्याच्या काळातील त्याला आवडणारे राजकीय व्यक्ती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतलं. श्रेयस तळपदेने मुलाखतीत सांगितलं की, "सध्याच्या राजकारणाकडे बघायचं झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मला कौतुक आहे. गेली १० वर्ष मोदीजी देशाचं काम करत आहेत. ते आधी देशाचा विचार करतात. अटलबिहारी वाजपेयी सुद्धा असेच होते. जनतेचा कौल नरेंद्र मोदीजी यांच्याकडे आहे. त्यामुळे एकूणच सध्याचं वातावरण पाहता नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, अशी चिन्हं आहेत."