Join us

बँडिट क्वीन: संपूर्ण गावासमोर शूट झाला रेप सीन; सीमा बिस्वास यांनी सगळ्यांसमोर उतरवले कपडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:51 PM

Bandit queen: या सीनसाठी गावाच्या चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. आणि, त्यानंतर त्या सगळ्यांसमोर नग्नावस्थेत आल्या.

1994 मध्ये आलेल्या 'बँडिट क्वीन' (bandit queen) हा चित्रपट या जन्मात तरी विसरणं अनेकांना शक्य नाही. फूलन देवीच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने अनेकांना सुन्न केलं. फूलन देवीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ज्यानंतर ती डाकू बनली. बँडिट क्वीन या सिनेमामध्येशेखर कपूर (shekhar kapoor) यांनी फूलन देवी यांच्या आयुष्यातील चढउतारांवर प्रकाश टाकला आहे. विशेष म्हणजे सिनेमातील भडक दृश्य आणि आशय यामुळे या सिनेमा वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. यामध्येच फूलनदेवी यांच्यावर झालेला रेप सीन नेमका कसा शूट झाला त्याविषयी आज जाणून घेऊयात.

बँडिट क्वीन या सिनेमामध्ये अभिनेत्री सीमा बिस्वास (seema biswas) यांनी फूलनदेवी यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील एका दृश्यामध्ये त्यांना गावकऱ्यांसमोर नग्न फिरायचे होते.  त्यामुळे हा सीन शूट करण्यासाठी त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. परंतु, सिनेमासाठी हा सीन खूप महत्त्वाचा असल्याचं दिग्दर्शकांनी सांगितलं. त्यानंतर हा सीन वेगळ्या पद्धतीने शूट करण्यात आला. विशेष म्हणजे हा सीन आजही मास्टरपीस मानला जातो. म्हणूनच तो नेमका कसा शूट झाला ते पाहुयात.

कसा शूट झाला हा सीन?

चित्रपटातील एका सीनमध्ये ठाकूर संपूर्ण गावासमोर फूलनदेवी यांचे कपडे उतरवतात. इतकंच नाही तर ज्या विहिरीजवळ तिच्यावर अत्याचार केला तेथून तिला पाणी आणण्यास सांगितलं. हा सीन करणं सिमा यांच्यासाठी कठीण होता. ज्यामुळे या सीनसाठी सीमा बिस्वासच्या बॉडी डबलचा वापर करण्यात आला.

सिनेमाच्या टीमलाही माहित नव्हतं या सीनविषयी

हा सीन नेमका कसा शूट करायचा हे चित्रपटाच्या टीमपैकी कोणालाही माहित नव्हतं. शेखर कपूर यांनी कोणाला त्याविषयी कल्पनादेखील दिली नव्हती. या सीनसाठी गावाच्या चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. तसंच वेशीवरही कुंपण बांधण्यात आलं होतं. त्यानंतर सीमा बिस्वास यांच्या बॉडी डबलने तिचे कपडे उतरवले. हा सीन सुरु झाल्यानंतर शेखर यांनी कुंपण काढण्यास सांगितले. त्यानंतर ही अभिनेत्री चक्क सगळ्या गावकऱ्यांसमोर आली. इतकंच नाही तर तिला या अवस्थेत पाहण्यासाठी संपूर्ण गाव गोळा झालं होतं. यावेळी गावकऱ्यांच्या खऱ्या प्रतिक्रिया कॅमेरात कैद झाल्या होत्या.

दरम्यान, हा सिनेमा लेखिका माला सेन यांच्या इंडियाज बँडिट क्वीन: द ट्रू स्टोरी ऑफ फूलन देवी या पुस्तकावर आधारित आहे. या सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन,कथालेखन सारं शेखर कपूर यांनी केलं आहे. 'बँडिट क्वीन'ला सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या सिनेमामध्ये सीमा बिस्वास यांच्या व्यतिरिक्त गजराज राव, निर्मल पांडे, सौरभ शुक्ला, मनोज बाजपेयी, आदित्य श्रीवास्तव, गोविंद नामदेव, राजेश विवेक, रघुबीर यादव आणि शेखर कपूर झळकले आहेत.

टॅग्स :सीमा बिस्वासशेखर कपूरबॉलिवूडसिनेमासेलिब्रिटी