Join us  

‘बँजो’ वाजेल प्रत्येकाच्या कानात

By admin | Published: November 19, 2016 2:35 AM

रितेश देशमुखचा ‘बँजो’ या चित्रपटाने चांगलीच प्रसंशा मिळविली. या चित्रपटाच्या माध्यमातून बँजो वाद्याच्या सुरांनी अनेकांना भूरळ घातली

रितेश देशमुखचा ‘बँजो’ या चित्रपटाने चांगलीच प्रसंशा मिळविली. या चित्रपटाच्या माध्यमातून बँजो वाद्याच्या सुरांनी अनेकांना भूरळ घातली. विशेष म्हणजे याच ‘बँजो’ला सन्मान मिळवून देण्यासाठी रितेश पुढे सरसावला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव व रितेश देशमुख बँजोची कथा उलगडणार आहेत.रवी जाधव आणि रितेश त्यांचा सिनेमा बँजो आणि रस्त्यावरच्या या कलेला आदर मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नाबद्दल सांगणार आहेत. हिंदी सिनेमासृष्टीचे सर्वात मोठे थिएटर असलेल्या ‘झी सिनेमा’वर महाराष्ट्राचा आवडता कलाकार रितेश देशमुख आणि लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांचा पहिला हिंदी सिनेमा ‘बँजो’चा रविवार, २० नोव्हेंबर २०१६रोजी रात्री ८.३० वाजता वर्ल्ड टीव्ही प्रीमियर दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.सिनेमाच्या संकल्पनेविषयी रवी जाधव म्हणाला, ‘मी नटरंग सिनेमावर काम करत होतो तेव्हापासून म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून बँजोचा विषय माझ्या डोक्यात घोळत होता. मला भारतातील रस्त्यांवरच्या कलाकारांसाठी काहीतरी करायचे होते, कारण त्यांना त्यांची गुणवत्ता सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही आणि पयार्याने त्यांच्या कलेला आदरही मिळत नाही. आपण जॅझ आणि हिप-हॉपबद्दल सतत बोलतो, पण हे प्रकारही स्ट्रीट आर्टचाच एक भाग आहेत आणि काही महान पॉप स्टार्सही रस्त्यावरूनच शिखरावर पोहोचले आहेत. मला लक्षात आले की, बऱ्याच लोकांना ‘बँजो’वाद्य किंवा बँजो कलाकारांबद्दल काहीही माहिती नाही.’ सिनेमात बँड नायकाची भूमिका करणारा रितेश देशमुख म्हणाला, ‘बँजो या स्ट्रीट आर्ट प्रकाराला आदर मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. हा सिनेमा रस्त्यावरचे सर्व कलाकार, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे.’ या सिनेमात तराट (रितेश देशमुख), ग्रीस (धर्मेश येलांडे), पेपर (आदित्य कुमार) आणि वाज्या (राम मेनन) या चार बँजो वादकांची कहाणी पाहायला मिळणार आहे, जे मुंबईच्या निम्न वर्गात राहात असतात आणि अमेरिकेत राहाणाऱ्या क्रिस्टिनाच्या (नर्गीस फाख्री) रुपाने त्यांना त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी मिळते... बँजो बँड हे आव्हान पेलू शकणार का? हे पाहण्यासाठी चित्रपट पहावाच लागेल.