Join us  

सावधान! भो भो येतोय..

By admin | Published: November 18, 2015 1:15 AM

घाबरलात? सावधान असं म्हटलं तरी घाबरू नका... पण हां... हा भो भो कोण येतोय याबद्दल तुम्ही नक्कीच विचार करू शकता. आणि सावधान का म्हटलं याबद्दल शंका आणू नका.

घाबरलात? सावधान असं म्हटलं तरी घाबरू नका... पण हां... हा भो भो कोण येतोय याबद्दल तुम्ही नक्कीच विचार करू शकता. आणि सावधान का म्हटलं याबद्दल शंका आणू नका. कारण एक मस्त मिट्री आणि अ‍ॅडव्हेंंंचर्स स्टोरीचंमिश्रण असलेला एक चित्रपट येत आहे, ज्याचे नाव आहे ‘भो भो’. पाळलेल्या कुत्र्याला त्याचा मालकच का मारतो? या कथेभोवती फिरणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन भरत गायकवाड यांचे असून, सुमुखेश फिल्म्स हा सादर करणार आहे. यामध्ये प्रशांत दामले, सुबोध भावे, अश्विनी एकबोटे, सौरभ गोखले, संजय मोने, किशोर चौगुले आणि अनुजा साठे आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिका बजावत असून, लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.