Join us

सुंदर चेहऱ्यांमागचा ‘चेहरा’

By admin | Published: May 13, 2016 1:39 AM

अनेक कलाकार आपल्या कलेनं चित्रपटसृष्टी गाजवताहेत. अशाच अनेक कलाकारांपैकी एक अवलिया म्हणजे मेकअपमन सुभाष शिंदे. गेल्या दोन दशकांपासून दिग्गज कलाकारांना

अनेक कलाकार आपल्या कलेनं चित्रपटसृष्टी गाजवताहेत. अशाच अनेक कलाकारांपैकी एक अवलिया म्हणजे मेकअपमन सुभाष शिंदे. गेल्या दोन दशकांपासून दिग्गज कलाकारांना रुपेरी पडद्यावर वेगळं रूप देण्याची किमया त्यांनी साधलीय. याच चेहऱ्यामागील चेहऱ्याविषयी जाणून घेणारा हा विशेष संवाद. खास ‘सीएनएक्स’च्या वाचकांसाठी...प्रश्न : ब्रश आणि कलरशी नातं कसं जुळलं?4लहानपणापासूनच मला चित्रकला, व्यंगचित्रं यांची विशेष आवड होती. आणि तेव्हापासूनच ब्रशवर खास पकड निर्माण झाली. त्यातच कलाकारांना कला सादर करण्यासाठी तयार करणं ही एक नवी कला आहे असं मला उमगलं आणि ते करण्यात मला आनंद मिळू लागला. मेकअपमनची कला शिकण्यासाठी कोणत्याही शाळेत किंवा संस्थेत गेलो नाही.प्रश्न : मेकअपमन म्हणून या चित्रपटसृष्टीत एन्ट्री कशी झाली?4चित्रपटसृष्टीत सहजासहजी काम मिळालं नाही. ब्लॅक, शिरीन फरहाद की निकल पडी, पतियाला हाउस सिनेमासाठी काम केलं. मेकअपमन म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतही प्रयत्न केले; पण संधी मिळाली नाही. अखेर राजीव पाटील यांनी ‘७२ मैल एक प्रवास’ या सिनेमात काम दिलं. त्यानंतर संजय जाधव यांच्या प्रत्येक सिनेमात काम केलं.प्रश्न : मेकअपमनचं काम चेहरा रंगवणं असा अनेकांचा गैरसमज आहे. याबद्दल काय सांगाल?4मेकअपमनचं मुख्य काम म्हणजे कलाकारांचा चेहरा रंगवणं इतकंच नाही, तर त्या व्यक्तिरेखेला रुपेरी पडद्यावर जिवंत करणं आहे. प्रत्येक सिनेमात कलाकाराचा लूक हा महत्त्वाचा असतो. त्या लूकला न्याय देणं हे कलाकाराचं पहिलं काम असतं.प्रश्न : एखादी व्यक्तिरेखा त्या दिग्दर्शकाची कल्पना असते. ती प्रत्यक्षात उतरवताना कोणती आव्हानं असतात?4सिनेमाची कथा लिहिताना त्या पात्राची कल्पना केलेली असते. लेखक आणि दिग्दर्शक यांच्या डोक्यात त्या व्यक्तिरेखेविषयी पक्कं ठरलेलं असतं. त्या व्यक्तिरेखेचा लूक कलाकाराची निवड होण्याआधी ठरलेला असतो. दिग्दर्शकानं एकदा व्यक्तिरेखा ठरवली की ती स्क्रीनवर जिवंत करण्याचं मेकअपमनचं काम सुरू होतं. त्यासाठी बरीच तयारी-रिसर्चसुद्धा करावं लागतं.प्रश्न : या क्षेत्रात तुम्ही केलेल्या विविध प्रयोगांबद्दल जाणून घ्यायला आवडेल?4पूर्वीच्या काळात चेहऱ्यावर जाड मेकअप लावला जायचा जो ठळकपणे चेहऱ्यावर दिसून येत असे. मात्र आताच्या काळात तुम्हाला कळणारसुद्धा नाही की कलाकारानं मेकअप केला आहे किंवा नाही. इतके सहज आणि सोप्या पद्धतीने सध्या मेकअप केला जातो. मी मेकअपमध्ये विविध प्रयोग केलेत. प्रोस्थेटिक तंत्र वापरून मेकअप करण्याचा चित्रपटसृष्टीतला कधीही न झालेला यशस्वी प्रयोग करून दाखवला. मेरी कॉम सिनेमातील प्रियांका चोप्राच्या लूकसाठी हा प्रयत्न केला आणि रसिकांना तो चांगलाच भावला.प्रश्न : एखादा खास प्रयोग जो तुम्ही केला. तो आमच्यासह शेअर कराल?4गोलियों की रासलीला - रामलीला सिनेमामध्ये दीपिका पदुकोणच्या मेकअपसाठी वेगळा प्रयोग केला. यात दीपिकाचा चेहरा धूळकट आणि काहीसा पिंगट दाखवायचा होता. त्यासाठी तैलरंगाचा आधार घेऊन धूळकट चेहरा दाखवला. याशिवाय दीपिकाच्या व्यक्तिरेखेसाठी गुजराती टॅटूही भन्साली यांना हवा होता. त्यासाठी बऱ्याच महिन्यांच्या रिसर्चनंतर त्यात यश आलं. सरबजीत सिनेमातील ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकसाठीही बरीच मेहनत घ्यावी लागली. प्रश्न : यापुढे तुम्ही बॉलिवूड दिवा श्रीदेवी यांच्यासह काम करताय. त्याबद्दल काय सांगाल?4श्रीदेवीबरोबर काम करणं हे कोणत्याही कलाकारासाठी भाग्याचीच गोष्ट असते. ‘मॉम’ या सिनेमात त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळतेय. त्या सिनेमात त्यांचा मेकअप करायला मिळणं यासाठी एक्साईटेड आहे. या सिनेमाच्या इतर गोष्टीबाबत आताच फार काही शेअर करू शकत नाही. जस्ट वेट अ‍ॅण्ड वॉच.