2005 मध्ये शरदने किर्ती गायकवाडशी लग्न केले. किर्ती ही टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. किर्ती व शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. याच मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना किशा नावाची एक मुलगी आहे. किर्तीने देखील किर्तीने सात फेरे, छोटी बहू, ससूराल सिमर का या मालिकेत काम केले. नच बलिए या रिअॅलिटी डान्स शोमध्येही तिला आपण पाहिले आहे. नुकतेच हे शरद केळकर कुटुंबासह सेलिब्रेशन मुडमध्ये दिसले. निमित्त होते मुलगी किशाच्या 6 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे. खास मुलीसाठी शरदनेही बर्थडे पार्टी आयोजित केली होती. यावेळी बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या कुटुंबासह येथे हजेरी लावत फुल ऑन धमाल केली. यावेळी शरद केळकर आणि त्याची पत्नी किर्ती अगदी स्टायलिश अंदाजात दिसले. किर्तीने यावेळी फ्रॉक परिधान केला होता यात ती अगदी ग्लॅमरस दिसत होती. यात ती एक डॉलप्रमाणेच दिसत होती. तसेच मुलगी किशाने देखील आई किर्तीसारखाच पेहराव केला होता.
नेहमीप्रमाणे शदर केळकर अगदी स्टायलिश अंदाजात दिसता होता. ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद झळकला. त्याने साकारलेल्या या भूमिकेने तर रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. सर्वच स्थरावरून त्याच्या भूमिकेचे त्याच्या कामाचे कौतुक झाले. त्यामुळे नक्कीच ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ सिनेमा शरद केळकरसाठी एक टर्निंग पॉइंट ठरला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त शदर केळकरचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळते.