'मुसाफिर' चित्रपटानंतर 'एक खिलाडी एक हसीना', 'अपना सपना -मनी मनी' यासारख्या चित्रपटात कोयना झळकली. मात्र कोयनाची कारकिर्द फारशी यशस्वी ठरली नाही. बॉलीवूडमध्ये अपयश आल्यानंतर तामिळ, बंगाली चित्रपटात तिने काम केले. २०१५ साली कोयना बेश कोरेची प्रेम कोरेची या बंगाली चित्रपटात झळकली. मात्र त्यानंतर ती चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेपासून दूर गेली.
कोयनाच्या जीवनात एक मठं वादळ आलं, ज्यामुळे तिचे करिअर पणाला लागलं. त्या काळात कोयना आपल्या चेहऱ्यावर खुश नव्हती. त्यामुळे आणखी सुंदर दिसण्यासाठी कोयनाने प्लास्टिक सर्जरी केली. तिने नाकाची सर्जरी केली. मात्र या सर्जरीचा उलट परिणाम झाला. सर्जरीमुळे कोयनाचा चेहरा आणखी खराब झाला. कधीकाळी कोयनाकडे अभिनयासह काही आयटम नंबर होते, मात्र सर्जरीनंतर दिग्दर्शकांनी कोयनाकडे पाठ फिरवली. कोयनाला या सर्जरीमुळे काम मिळणं बंद झालं. तिच्यावर घरी बसण्याची वेळ आलीय. चित्रपटसृष्टीपासून ती दूर गेली.
घरातून बाहेर पडणंही तिला कठीण बनलं. सर्जरीमुळे तिचा चेहरा खराब झाला. औषधं आणि प्रार्थनाच काही चमत्कार करेल असंही डॉक्टरांनी कोयनाला सांगितलं. तरी कोयना हिंमत हरली नाही. त्या चेहऱ्यासह ती घराबाहेर पडू लागली. जे घडलं ते मान्य करण्याशिवाय कोयनाकडे पर्याय नव्हता. मात्र लोक तिला स्वीकारण्यास तयार नव्हते. संकटसमयी तिच्या मित्रांनीही तिची साथ सोडली. चेहरा ठीक करण्यासाठी कोयनाने आणखी काही सर्जरीसुद्धा केल्या. मात्र त्यात यश आलं नाही.